शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे यंदा उद्भवणार चाराटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:28 IST

रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले असून, या पिकातून गुरांसाठी मिळणारे कुटारही नष्ट झाले आहे. त्यात खरीप हंगामात ज्वारीची पेरणी कमी होते. त्यामुळे पुढील काळात चाऱ्याची समस्या गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात चारापिकांवर प्रामुख्याने रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून खरीप ज्वारीसह इतर तृणधान्याच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. प्रामुख्याने ज्वारी, बाजरीचे क्षेत्र आता नावापुरतेच राहिले आहे. त्यातच कपाशीचे क्षेत्रही घटल्याने गुरांच्या चाºयाचा प्रश्न सतत पशूपालकांना भेडसावत आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिेले असले तरी, शेतकरी ज्वारीच्या पेºयावर भर देण्याची शक्यता कमीच आहे. वन्यप्राण्यांचा त्रास बाजारात अपेक्षेच्या तुलनेत मिळणारे कमी दर आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी ज्वारीसह इतर चारा पिकांकडे पाठ करीत आहेत.ज्वारी, बाजरीचा पेरा घटल्याने कडबा मिळणे कठीण आहे. तर कपाशीचा पेरा घटल्याने सरकी, सरकी ढेपेचे दर गगनाला भिडले आहेत. अशात गुरांच्या चाºयासाठी सोयाबीनच्या कुटाराचा मुख्य आधार पशूपालक आणि शेतकरीवर्गाला मिळाला होता. जिल्ह्यात हिवाळ्याच्या मध्यंतरापासून हिरवा चारा नष्ट झाल्यानंतर या कुटारावरच गुरांचे भरणपोषण करण्यावर भर दिला जातो. आता यंदा अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले. त्यात प्रामुख्याने सोयाबीनच्या शेंगा आणि झाडे पावसाने कुजल्याने कुटार उपलब्ध होण्याची शक्यताच मावळली आहे. त्यात ज्वारीच्या पिकाचा पेरा नावापुरताच असून, इतर चारापिकेही शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे यंदा हिवाळा अखेरपासून जिल्ह्यात पशूंच्या चाºयाचा प्रश्न गंभीर रुप धारण करणार आहे. या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असेल, तर शेतकºयांना यंदाच्या हंगामात रब्बी ज्वारीसह इतर चारा पिकांवर भर देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, कृषी विभागानेही यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत रब्बी ज्वारीच्या पेरणीचे नियोजन वाढविले असून, गळीत धान्याचा पेरा वाढविण्यावरही कृषी विभागाकडून भर देण्यात येणार आहे. कृषी विभागाच्या या प्रयत्नांना शेतकºयांचा प्रतिसाद लाभला किंवा चाराटंचाईची तिव्रता लक्षात आली, तरच जिल्ह्यातील संभाव्य चाराटंचाईवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे मत कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनीही व्यक्त केले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी