चारचाकी वाहनाच्या अपघातात पाच जण जखमी

By Admin | Updated: September 5, 2016 02:52 IST2016-09-05T02:52:28+5:302016-09-05T02:52:28+5:30

कारंजा तालुक्यातील तपोवन नजिक अपघात.

Five people injured in four-wheeler car crash | चारचाकी वाहनाच्या अपघातात पाच जण जखमी

चारचाकी वाहनाच्या अपघातात पाच जण जखमी

कारंजा लाड (जि. वाशिम) ४ : चारचाकी वाहनात अचानक बिघाड होऊन चाकाचे ह्यबोल्टह्ण तुटल्याने घडलेल्या अपघातात आयसीआयसीआय बँकेच्या चार कर्मचार्‍यांसह पाच जण जखमी झाले. ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर-औरगांबाद महामार्गावर तालुक्यातील तपोवननजिक घडली.
ह्यआयसीआयसीआयह्ण बँकेच्या नागपूर शाखेचे कर्मचारी एमएच ३१, डी.एस- ४२१६ या क्रमांकाच्या वाहनाने कारंजामार्गे नागपूरकडे जात होते. दरम्यान, तपोवननजिक गाडीचे बोल्ट तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही गाडी उलटी झाली. या अपघातात रमेश तायवाडे (५0), चेतन गांजरे (२६), प्रमोद बागवान (४२), रामा शिषपाल, राजेंद्र तुरकाने (५५) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Five people injured in four-wheeler car crash