शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषी विद्यापीठांच्या नोकर भरतीचे आदेश धडकले !

By admin | Updated: November 14, 2014 01:13 IST

प्रभाव लोकमतचा; नोकर भरतीचा मार्ग मोकळा.

राजरत्न सिरसाट/अकोलाकृषी विद्यापीठांच्या नोकर भरतीचे आदेश अखेर गुरू वारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना प्राप्त झाले असून, एक वर्षापासून रखडलेली विद्यापीठांतील दोन हजाराच्यावर पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या आदेशानुसार कनिष्ठ व वरीष्ठ सहाय्यक संशोधकांपर्यंतची पदं जुन्याच पध्दतीने भरण्याचे अधिकार कृषी विद्यापीठांना मिळाले आहेत. कृषी विद्यापीठ स्तरावर निवड समितीचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नोकर भरती निवड समितीच्या अध्यक्षपदी संशोधन संचालक डॉ. प्रदिप इंगोले यांची नेमणूक करण्यात आली आहे.गतवर्षी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ नोकर भरती मंडळ स्थापन केले होते; तथापि एक वर्षापासून हे मंडळच कार्यरत न झाल्याने कृषी विद्यापीठांची नोकर भरती प्रक्रिया रखडली होती. या अगोदरही कृषी विद्यापीठ स्तरावर राबविण्यात येणार्‍या नोकर भरतीला अनेक अथडळे आले होते. त्यामुळे विद्यापीठांच्या नोकर भरतीचा अनुशेष वाढला आहे.अकोल्याच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील जवळपास पावणे हजार पदे रिक्त आहेत. कृषी विद्यापीठाने गतवर्षी १७२ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. शासन आदेशानंतर सर्वप्रथम ती प्रक्रीया पूर्ण करण्यात येणार आहे. परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ५00 पदं भरण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, येत्या १५ दिवसात यासाठी जाहीरात काढली जाणार आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पहिल्या टप्प्यात ६२५ पदे भरली जाणार आहेत. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठानेही नोकर भरतीच्या प्रकियेला सुरूवात केली आहे. *जुन्या पध्दतीत अंशत: बदल जुन्या नोकर भरती प्रक्रीयेमध्ये अंशत: बदल करण्यात आले आहेत. पूर्वी ४0 टक्के व्यक्तिगत माहिती आणि ६0 टक्के मुलाखती याप्रमाणे उमेदवारांना गुण देण्यात येत होते. नव्या पध्दतीत ५0 टक्के व्यक्तिगत (संशोधन, अनुभव) माहिती, ३0 टक्के गूण सादरीकरण, तसेच विषयाचे ज्ञान याला, तर २0 टक्के गुण मुलाखतीला दिले जाणार आहेत.