शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण क्षेत्रात १२ वेळा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेले शिक्षक जाेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST

नंदकिशोर नारे वाशिम : पर्यावरण क्षेत्रातील बहुमूल्य योगदान, वृक्षारोपण व संवर्धनात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक ...

नंदकिशोर नारे

वाशिम : पर्यावरण क्षेत्रातील बहुमूल्य योगदान, वृक्षारोपण व संवर्धनात उल्लेखनीय कार्य करणारे शिक्षक वाशिम शहरातील एस.एम.सी. इंग्लिश स्कूलमध्ये असून त्यांचे नाव आहे अभिजित जाेशी. त्यांनी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाने १२ वेळा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शिक्षक दिनानिमित्त या शिक्षकाच्या कार्याला सलाम. पर्यावरणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या या शिक्षकाने आगळे वेगळे उपक्रम राबवून पर्यावरणाचा ऱ्हासही थांबविला आहे.

जाेशी यांनी राष्ट्रीय हरित सेनेच्या कार्याची सुरुवात २००९ मध्ये केली. सामाजिक वनीकरण विभागच्यावतीने हरित सेनेचे समन्वयक म्हणून त्यांची निवड झाली व त्याच वर्षी सामाजिक वनीकरण विभाग वाशिमच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले. त्यानंतर एस.एम.सी. इंग्लिश स्कूल वाशिमचा राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक म्हणून या कार्यशाळेत उपस्थित झाले. जाेशी यांना लहानपणापासूनच वृक्षलागवड व संवर्धनाची आवड होती. त्यातच या कार्यशाळेत पर्यावरण क्षेत्रातून आलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केलेले मार्गदर्शन यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण कसा थांबवू शकतो याचे विचार मनात घोळायला लागला व त्यातूनच त्यांनी कार्याला सुरवात केली ती आजवर अविरत सुरू आहे.

-----

पर्यावरण क्षेत्रातील राबविलेले उपक्रम ....

वृक्ष वाचविण्यासाठी संक्रांतीच्या सुगड्यांचा वापर, श्रावणमासात महादेवाच्या मंदिर परिसरात बेल वृक्षारोपण, पर्यावरणपूरक होळी -नैसर्गिक रंग निर्मिती व जनजागृती, वृक्ष वाचविण्यासाठी बिहार पॅटर्नचा अवलंब, सिड बँकेची निर्मिती,पर्यावरण पूरक दसरा शमी व आपटा वृक्षांचे वाटप व वृक्षारोपण, जागतिक भूगोल दिन प्रभातफेरीचे आयोजन,रस्त्यावरील रोड द्विभाजकावर वृक्षारोपण.

रेनवाॅटर हार्वेस्टिंगसह राबविलेले विविध प्रकल्प ....

विविध उपक्रमासाेबतच शिक्षक अभिजित जाेशी संरानी विविध प्रकल्प उभारले. त्यातील काही महत्त्वाच्या प्रकलपमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प, बहार रोपवाटिका, नक्षत्र वन, अटल आनंद घन वन योजना (आनंद घन वनमध्ये २५ बाय १०च्या बेडमध्ये ७५० वृक्षांची लागवड) राशीवर उद्यान :राशीनुसार वृक्षांची लागवडीचा समावेश आहे.

या गुरुवर्यांचे व मान्यवरांचे लाभले जीवनात सहकार्य...

पर्यावरण क्षेत्रात कार्य करताना एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, प्राचार्य मीना उबगडे, पवन खंडेलवाल, शाळेतील माळी विशाल भंगी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी लक्ष्मण पाटील, सहायक वन संरक्षक यु.म. फड, उपवनसंरक्षक वन विभागाचे सुमंत सोळंके, सहायक वन संरक्षक किशोर येथे, वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश बाळापुरे, जन्मजय जाधव, आर. जी. रत्नपारखी, संजय नांदूरकर, हिराकांत अंभोरे वाहन चालक सामाजिक वनीकरण यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे जाेशी सांगतात.