शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

सलग २० दिवस सर्दी, खोकला असेल तर ‘अस्थमा’ आजार होण्याची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

संतोष वानखडे वाशिम : कोरोनातून बरे झालेल्यांना अन्य आजारही जडत असल्याचे समोर येत आहे. सलग २० दिवसांपेक्षा अधिक काळ ...

संतोष वानखडे

वाशिम : कोरोनातून बरे झालेल्यांना अन्य आजारही जडत असल्याचे समोर येत आहे. सलग २० दिवसांपेक्षा अधिक काळ सर्दी, खोकला असेल तर अस्थमा (दमा) आजार जडण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अशा रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन स्वत: सुरक्षित ठेवावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला.

कोरोनातून बरे झालेल्यांना वातावरणातील बदलामुळे अन्य आजारही जडत असल्याचे समोर येत आहे. कोरोनामुळे फुप्फुस कमजोर झाल्याने आणि ॲलर्जी असल्याने पोस्ट कोविडच्या काही जणांना अस्थमा आजाराची प्राथमिक लक्षणे आढळून येत आहेत. अस्थमा हा फुप्फुसातील श्वास वाहिन्यांशी संबंधित आजार असून, यात विशेषत: श्वास सोडण्यास त्रास जाणवतो. दम लागण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांना धुळीमुळे श्वास घेण्यास त्रास होतो. या धुळीमध्ये अनेक ॲलर्जीकारक घटक असतात. यामुळे वारंवार सर्दी व खोकलादेखील येतो. गत एका महिन्यापासून वातावरणात बदल होत असल्याने पोस्ट कोविडच्या काही रुग्णांना १५ ते २० पेक्षाही अधिक दिवस सर्दी, खोकला, डोकेदुखी आदी लक्षणे जाणवत आहेत. यावर वेळीच निदान केले नाही किंवा दुखणे अंगावर काढले तर अस्थमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वेळीच निदान व उपचार मिळाले तर हा आजार पूर्णत: बरा होणारा असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

.......

पोस्ट कोविडच्या रुग्णांना काय लक्षणे जाणवत आहेत?

वातावरणातील बदलामुळे दीर्घकाळ सर्दी, खोकला.

धुळीच्या ॲलर्जीमुळे वारंवार सर्दी येणे.

वारंवार शिंका येणे.

पायऱ्या चढताना दम लागणे.

श्वास घेताना त्रास जाणवणे.

००००००००००००००००

दक्षता काय घ्यावी?

थंड पाणी, थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

ॲलर्जी असलेल्या वस्तू, पदार्थांपासून दूर राहावे.

पावसात भिजणे टाळावे.

कान, नाकाला थंड हवा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तातडीने औषधोपचार सुरू करणे.

००००००००००००००

कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण ४१०४३

अस्थमाची प्राथमिक लक्षणे आढळून येणारे ८०

००००००

डॉक्टर म्हणतात वेळीच निदान व्हावे

कोट

न्यूमोनिया, कोरोनातून बरे झालेल्या काही जणांमध्ये अस्थमाची प्राथमिक लक्षणे आढळून येत आहेत. वेळीच निदान व उपचार मिळाले तर या आजारातून रुग्ण पूर्णत: बरा होऊ शकतो. त्यामुळे कोणताही आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. सिद्धार्थ देवळे,

एमडी, मेडिसीन, वाशिम.

.......

पोस्ट कोविडच्या काही जणांना दीर्घकाळ सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. ॲलर्जीमुळे सर्दीचा त्रास वाढतो. अशा रुग्णांनी धुळीपासून दूर राहावे, थंड पाणी, थंड पदार्थांचे सेवन टाळावे. वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो.

-डॉ. अमित राठी,

एमडी, मेडिसीन, वाशिम.