शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध!

By admin | Updated: June 1, 2017 01:15 IST

काम बंद ठेवण्याची मागणी : रस्त्याचे काम निकृष्ट

लोेकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन : किन्ही घोडमोड मार्गे पर्यायी म्हणून केला जाणारा रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होऊन मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून, रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली.२००५ -०६ पासून मंजुरात असलेल्या मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला मागील दोन महिन्यांपासून गती मिळाली आहे. सदर काम थंड बस्त्यात असताना लोकमतने पाठपुरावा करून सदर कामे त्वरित होण्यासाठी पुढाकार घेतला होता. याची दखल अधिकाऱ्यांनी घेऊन कामाला गती दिली होती. सद्यस्थितीत पांगरखेडा ते चांडस गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम जोरात सुरू आहे; मात्र बुडीत क्षेत्रात गेलेल्या शिरपूर मिर्झापूर रस्त्याला पर्याय म्हणून किन्ही घोडमोड मार्गे केलेला पर्यायी रस्ता अतिशय अरुंद व तकलादू बनविल्या जात आहे. सदर होत असलेल्या कामाच्या निषेधार्थ ३० मे पासून मिर्झापूर, घाटावासीयांनी प्रकल्पाच्या कामाला विरोध करून काम बंद ठेवण्याची मागणी केली होती. ३१ मे रोजीसुद्धा सदर कामावर जावून ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याचप्रमाणे शिरपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात कॅनॉलचे खोदकाम पाच ते सात वर्षांपासून करण्यात आले; परंतु त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. मोबदला त्वरित देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.‘त्या’नंतरच कामास सुरुवात करण्याची मागणी२००५-०६ मध्ये मिर्झापूर लघु प्रकल्पाला मंजुरात मिळून २००९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. यासाठी २१० हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली. या शिरपूर मिर्झापूर रस्त्याचा काही भाग प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात समाविष्ट होणाार असल्याने मिर्झापूर घाटावासीयांनी पर्यायी रस्त्याची मागणी केली. याकडे तत्कालीन लघुसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. पर्यायी रस्त्यासाठी त्यावेळी दोन्ही गावाच्या नागरिकांनी आमरण उपोषणही केले होते. त्याची दखल घेऊन दोन वर्षापूर्वी मिर्झापूर-किन्ही घोडमोड हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला; परंतु हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने समोरासमोर दोन वाहने आले की वाहन काढणे शक्य नसल्याने व केलेले रस्त्याचे काम अतिशय थातूरमातूर असल्याने व संथ गतिने सुरु केलेल्या प्रकल्पाच्या कामाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच ते काम थांबविले आहे. रस्ता चांगला व मोठा करण्याची मागणी ग्रामस्थ करीत असून, त्यानंतरच कामास सुरुवात करण्याची मागणी होत आहे.