शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री सरनाईक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:19 IST

रिसोड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब ऊर्फ गोविंदराव सरनाईक यांचे शनिवारी रात्री अकोला येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कवठा येथे रविवारी दुपारी २ वाजता शोकाकुल  वातावरणात तथा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

ठळक मुद्देहजारो चाहत्यांची उपस्थितीपोलीस दलातर्फे मानवंदना

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाबासाहेब ऊर्फ गोविंदराव सरनाईक यांचे शनिवारी रात्री अकोला येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी कवठा येथे रविवारी दुपारी २ वाजता शोकाकुल  वातावरणात तथा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरनाईक यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील राजकीय पदाधिकार्‍यांसह त्यांच्या चाहत्या वर्गाने मोठय़ा संख्येने हजेरी लावली. बाबासाहेब सरनाईक यांचे  पार्थिव अकोल्यावरून त्यांच्या मूळगावी कवठा चिखली येथे रविवारी सकाळी आणण्यात आले. दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून निघाली असता, त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांसह प्रशासन अधिकारी या नात्याने रिसोड येथील नायब तहसीलदार बी.बी. बरवे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. अंत्यसंस्कारावेळी पोलीस दलातर्फे हवेत तीन फैरी झाडून माजी मंत्री बाबासाहेब यांना भावपूर्ण मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे थोरले पुत्र डॉ. तिलकराज यांनी मुखाग्नी दिला. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख, विरोधी पक्षनेते माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे, माजी आमदार दाळू गुरुजी, डॉ.जगन्नाथ ढोणे, विठ्ठलराव शिंदे, अँड.विजयराव जाधव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वामनराव देशमुख, डॉ. चंद्रशेखर देशमुख, लखनसिंह ठाकूर, माजी जि.प. सदस्य दिलीपराव देशमुख, बाळासाहेब खरात, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष  दिलीप आसरे, वाय.के.. इंगोले, अँड.पी.पी. अंभोरे आदींची उपस्थिती होती.