शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा शहराला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: September 26, 2014 23:38 IST

सामाजिक स्वास्थ्य धोक्यात : नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज.

कारंजालाड (वाशिम) : संबंध कारंजा शहराभोवती अतिक्रमणाचा घट्ट विळखा बसला असून, प्रशासकीय यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते. प्रशासकीय यंत्रणा अतिक्रमण हटविण्याबद्दल उदासीन राहिल्यास सर्व शासकीय व नगर परिषदेच्या अखत्यारीतील जमिन अतिक्रमणाच्या दाढेत गायब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारंजा शहराला लागून खेर्डा, कोळी, किन्ही राजा, तुळजापूर अशा ग्रामपंचायतीची हद्द आहे. शहराच्या पूर्वेस व दक्षिणेस खेर्डा ग्रामपंचायत दक्षिणेच्या काही भागात किन्ही ग्रामपंचायत, काळी खेर्डा, पश्‍चिमेस तुळजापूर, उत्तरेस ग्रामपंचायत शहा या शहराला लागून असणार्‍या ग्रामपंचायत जमिनीवर कुणाचेही नियंत्रण नाही. या शहराच्या सभोवताल एक हजार रूपये फुटाचे प्लॉटचे भाव आहे व त्याच परिसरात अतिक्रमण केल्यास मोफत जागा. कुष्ठरोगाचा दवाखाना देखील अतिक्रमणाच्या कर्करोगापासून वेगळा राहू शकला नाही. पंचायत समिती ते म.ब्र.आश्रम असंख्य अतिक्रमण झाली आहेत. विद्याभारती महाविद्यालय ते धाबेकर महाविद्यालयाच्या मागे संपूर्ण परिसरात अतिक्रमण धारकांनी झोपड्या बांधल्या आहेत. कुष्ठरोगाच्या दवाखान्याच्या पायथ्याशी, बाजूला सगळी अतिक्रमणच झाली आहे. कारंजा शहराची प्राचीन संस्कृती व परंपरा जपणारा सारंग तलाव या तलावाच्या पात्रात अतिक्रमण झालीत. ती उठावित यासाठी तहसीलदार कारंजा व माजी नगर परिषद मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी खूप प्रयत्न केलेत पण ही अतिक्रमणे स्त्रियांनी केली आहे. महिलांच्या नावावर अतिक्रमण आहेत आणि या महिला सरळ प्रशासकीय यंत्रणेलाच आवाहन केलेय जातीवाचक व विनयभंगाच्या प्रकरणात अडकविण्याचे त्यामुळे अतिक्रमण हटविण्यसाठी महिला मागासवर्गीय अधिकार्‍याची गरज आहे.