सहकार क्षेत्रातील निवडणूक लांबणीवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:50+5:302021-09-09T04:49:50+5:30

000 खड्ड्यामुळे वाहनचालकांची गैरसोय वाशिम : वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील कोविड केअर सेंटरजवळील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय ...

Election in the co-operative sector postponed? | सहकार क्षेत्रातील निवडणूक लांबणीवर?

सहकार क्षेत्रातील निवडणूक लांबणीवर?

000

खड्ड्यामुळे वाहनचालकांची गैरसोय

वाशिम : वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील कोविड केअर सेंटरजवळील रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सिव्हिल लाईनकडून जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गाकडे वळणाच्या ठिकाणीच खड्डे असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

0000

क्षयरुग्णांची नोंदणी करण्याची गती द्या

वाशिम : खासगी रुग्णालये, खासगी औषधी विक्रेते, प्रयोगशाळा यासारख्या संस्थांनी क्षयरुग्णांची विहीत नमुन्यातील माहिती व नोंदणी जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाकडे नियमितपणे सादर करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्याची गती वाढवावी अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

00000

नवीन रेशनकार्डवर धान्य मिळेना !

वाशिम : रिसोड, वाशिम, कारंजा तालु्क्यातील नवीन रेशनकार्डधारकांना अद्याप स्वस्त धान्याचा पुरवठा सुरू झाला नाही. स्वस्त धान्य पुरवठा होण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदेश पारित करावा, अशी मागणी रेशनकार्डधारकांनी बुधवारी केली.

०००००००००

रोहित्रांना संरक्षक कठड्यांचा अभाव

वाशिम: जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्रांचे बॉक्स उघडे असून, संरक्षक कठड्याचा अभाव असल्याने अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Election in the co-operative sector postponed?