शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा

By admin | Updated: November 14, 2014 01:28 IST

वाशिम जिल्हा परिषदेच्या सभेत महिला सदस्यांनी लावून धरला शिक्षण व आरोग्याचा प्रश्न.

वाशिम : स्थानिक जिल्हा परिषदेच्या १३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, महिला व बालकल्याण सभापती ज्योति गणेशपुरे, कृषी व पशु संवर्धन सभापती हेमेन्द्र ठाकरे, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डी. ए. वानखेडे यांची मंचावर उपस्थिती होती. सभेत महिला सदस्य आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांवर आक्रमक झाल्याचे दिसून आल्या.तेराव्या वित्त आयोगाच्या ८८ लक्ष २८ हजार निधीचे वितरण सर्व जि. प. सर्कलमध्ये समान प्रमाणात करावे, असा ठराव नत्थुजी कापसे यांनी मांडला. त्यास विकास गवळी यांनी अनुमोदन दिले, तसेच हा निधी रस्ते, पूल बांधकाम, किरकोळ दुरुस्ती यावर खर्च करावे, असेही ठरविण्यात आले.पशु प्रदर्शन, कृषी चर्चासत्र, बौलबंडी वाटप यासह समाजकल्याण व महिला बालकल्याणच्या विविध अनुदानाच्या मुद्यांवर अनेक सदस्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले. जि. प. सदस्य चंदु जाधव यांनी मालेगाव पंचायत समिती अंतर्गत कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा शेवटपयर्ंत लावुन धरला. याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे आश्‍वासन साप्रविचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांनी दिले. जि. प. शाळेच्या समस्यांवर महिला सदस्यांनी सभागृहात आपला रोष व्यक्त केला. मीनाताई भोने यांनी सुरुवातीला हा प्रश्न लावून धरला. नंतर उषा जाधव यांनीही आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. अनेक ठिकाणी शाळेची शिक्षकांअभावी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. आरोग्य आणि शिक्षणाबाबत निर्णय प्रक्रियात आम्हालाही विश्‍वासात घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी अनुपस्थित असल्यामुळे जयवंशी यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले. बिंदुनामावली मंजूर झाल्यानंतर याबाबत पदभरती करता येईल; तसेच अतिरिक्त शिक्षकांची मागणी शासनाकडे करण्यात येईल, असे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांनी सांगितले.