प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 17:34 IST2020-12-13T17:32:07+5:302020-12-13T17:34:01+5:30
संतोष सखाराम मुळे (३९) रा. माधव नगर, वाशिम याचा उपचारादरम्यान अकोला येथे १३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.

प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
वाशिम : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष सखाराम मुळे (३९) रा. माधव नगर, वाशिम याचा उपचारादरम्यान अकोला येथे १३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
संतोष मुळे याची आई राधाबाई सखाराम मुळे (६५) यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना दोन मुले असून, संतोष हा मोठा आहे. संतोष हा रिसोड मार्गावरील एका शेतात नारायण नागरे व संतोष नागरे यांच्यासोबत दररोज काम करीत होता. ६ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता संतोष हा नेहमीप्रमाणे कामावर गेला असता, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास संतोष नागरे व पिंटू सोपान चौधरी यांनी त्याला जखमी अवस्थेत घरी आणून परत गेले. संतोष नागरे, नारायण नागरे, पिंटू चौधरी व बालू यांनी संगणमत करून जबर मारहाण केल्याचे संतोष मुळे याने सांगितले. जखमीला उपचारार्थ वाशिम येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता, प्रकृती गंभीर असल्याने अकोला नेण्यात आले. उपचारादरम्यान १३ डिसेंबर रोजी संतोष मुळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आरोपी संतोष नागरे, पिंटू सोपान चौधरी, बाळू व नारायण नागरे यांच्याविरुद्ध भादंवी कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.