शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

उच्च रक्तदाबाने गर्भवती महिलेचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2015 02:16 IST

कारंजा येथील घटना; तणावपूर्ण वातावरण.

कारंजा: उच्च रक्तदाबाने अंजनगाव सुर्जी येथील २३ वर्षीय गर्भवती महिलेचा येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये शनिवार २ मे रोजी मृत्यू झाला. त्यामुळे काही वेळ हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कारंजा येथील काजीपुरा भागातील माजी नगरसेवक नसरुल्लाखा यांची गर्भवती मुलगी अमरीन कौसर मो. शारीक ही स् थानिक नवीन बसस्थानकाजवळच्या विठ्ठल हॉस्पिटलमधील डॉ. रश्मी गुंजाटे यांच्याकडे उपचार घेत होती. शुक्रवार १ मे रोजी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास गर्भवती महिलेला तिच्या नातेवाइकांनी बाळंतपणासाठी विठ्ठल हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. गर्भवती महिलेच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी नैसर्गिक बाळंतपण होण्यासाठी प्रयत्न केले; पण शनिवार २ मे च्या सकाळी महिलेचा रक्तदाब मोठय़ा प्रमाणात वाढला. यावेळी डॉ. गुंजाटे यांनी भूलतज्ज्ञ डॉ. सुरेश भोडणे, डॉ. अजय कांत, डॉ. शार्दूल डोणगावकर, डॉ. यशवंत टेकाडे यांना हॉस्पिटलला बोलावले. सर्व तज्ज्ञ विठ्ठल हॉस्पिटलला पोहोचले; मात्न गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यापूर्वीच सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. दरम्यान, ही बातमी वार्‍यासारखी पसरल्याने हॉस्पिटल परिसरात शेकडो नागरिकांची गर्दी झाली. प्रसंगावधान पाहून डॉ. राम गुंजाटे यांनी पोलिसांना कळविले. पोलीसही तातडीने हॉस्पिटलजवळ पोहोचले. डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी गर्भवती महिलेच्या नातेवाइकांची समजूत काढली.