डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचे मानधन थकले

By Admin | Updated: September 29, 2014 01:33 IST2014-09-27T23:52:12+5:302014-09-29T01:33:28+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

Data entry operators exhausted | डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचे मानधन थकले

डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचे मानधन थकले

कारंजा लाड (वाशिम): वाशिम एन. आर. एच. एम. अंतर्गत कार्यरत डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचे मानधन सहा महिन्यांपासून थकित आहे. हे वेतन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे २५ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयांतर्गत सहा महिन्यांपासून अकाऊंट कम डाटा एन्ट्री ऑपरेटर्स अनेकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व ऑपरेटर्स आपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडीत आहेत; परंतु या सहा महिन्यांत त्यांना एकदाही मानधन देण्यात आले नाही. कामाचा मोबदला म्हणून कोणतेही मानधनच मिळत नसल्याने त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात सबंधित अधिकार्‍यांकडे विचारणा के ल्यानंतर त्यांच्याकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, अशा आशयाचे निवेदन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे २१ डाटा एन्ट्री ऑपरेटर्सच्या वतीने सादर करण्यात आले असून, याबाबत लवकर निर्णय घेऊन न्याय देण्याची मागणी त्यांच्याक डून करण्यात आली आहे. या निवदेनाची प्रत जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अध्यक्ष, जि.प. आरोग्य सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.

Web Title: Data entry operators exhausted