पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे नोंदणीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST2021-09-08T04:49:39+5:302021-09-08T04:49:39+5:30

सोमवारी रात्री जिल्ह्यात जाेरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेली ...

Crop damage, appeal to farmers to register with insurance company | पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे नोंदणीचे आवाहन

पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे नोंदणीचे आवाहन

सोमवारी रात्री जिल्ह्यात जाेरदार पाऊस पडला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठावरील अनेक शेतकऱ्यांची पिकांसह शेतजमीन खरडून गेली आहे. यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी ७२ तासांच्या आत १८००१०२४०८८ या टोल फ्री क्रमांकावर आपली नोंदणी करावी. तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲपचा वापर करून किंवा प्रत्यक्ष कृषी विभागाकडे नुकसानीची नोंदणी करावी, असे आवाहन पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी व कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

---------------

कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक करणार मार्गदर्शन

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना वेळेत भरपाई मिळावी म्हणून पीकविमा कंपनीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून, ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हे मार्गदर्शन करणार असून, त्यानंतरही काही अडचण असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Crop damage, appeal to farmers to register with insurance company