२५५० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; २९ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:03 IST2021-01-14T16:03:10+5:302021-01-14T16:03:17+5:30
Grampanchayat Election २५५० अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली असून, यापैकी २९ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

२५५० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; २९ पॉझिटिव्ह
वाशिम : मतदान प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मतदान केंद्रात नियुक्त २५५० अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली असून, यापैकी २९ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा आलेख खाली आल्याने १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने उर्वरित १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जवळपास ६०० केंद्रांत मतदान होत असून, मतदान प्रक्रियेतून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिकारी, कर्मचाºयांची कोरोना चाचणी करण्यात आली. जवळपास २५५० जणांची चाचणी केली असता, यापैकी २९ जण पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह कर्मचाºयांना गृह विलगीकरणात ठेवले असून, त्यांच्याऐवजी अतिरिक्त कर्मचारी, अधिकाºयांना मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले.
तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह
रिसोड ११
मालेगाव १०
म.पीर ०२
वाशिम ०२
मानोरा ०४
कारंजा ००