शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी केंद्राचे बांधकाम रखडले

By admin | Updated: June 1, 2017 14:35 IST

अंगणवाडी क्रमांक तीनच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. 

पार्डी ताड - मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील अंगणवाडी क्रमांक तीनच्या इमारतीचे बांधकाम रखडले आहे. अंगणवाडी क्रमांक तीनच्या इमारत बांधकामाला २०११ मध्ये सुरूवात झाली होती. या इमारतीच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, स्लॅपचे बांधकाम अपूर्ण आहे. उर्वरीत निधी अप्राप्त असल्याने बांधकाम रखडल्याचे सांगितले जाते. पार्डी ताड येथे तीन अंगणवाडी केंद्र असून, तीन अंगणवाडी सेविका व तीन मदतनीस यांची नियुक्ती झालेली आहे. दोन अंगणवाडीचे बांधकाम झालेले असून, आता केवळ एका अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. क्रमांक तीनच्या अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण असल्याने चिमुकल्यांना अंगणवाडी इमारतीबाहेर बसण्याची वेळ यापूर्वी आली होती. आता शाळा सुरू झाल्यानंतरदेखील चिमुकल्यांना शिकविण्याचा पेच आहे. जून्याच अंगणवाडी बसवून चिमुकल्यांना शिकवावे लागेल, अशी शक्यता दिसत आहे. पंचायत समितीच्या एका विश्वस्त अभियंत्याला विचारले असता, अंगणवाडीच्या उर्वरीत बांधकामाकरिता पंचायत समितीमध्ये फेब्रुवारी २०१७ मध्ये निधी आला होता. मात्र, ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे तो निधी खर्च झाला नाही, असे विश्वसनीय सूत्राचे म्हणणे आहे. याबाबत विद्यमान ग्राम पंचायत सचिव दीपा सुर्वे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, अर्धवट राहिलेल्या अंगणवाडी बांधकामाची मला माहिती नाही. यापूर्वीच्या सचिवाने याबाबत माहिती दिली नसल्याने या विषयावर अधिक काही सांगता येणार नाही, असे सुर्वे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.