शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:49 IST

वाशिम : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, याचा अस्थमा रुग्णांना अधिकचा धोका असतो. त्यामुळे आरोग्याची अधिक काळजी ...

वाशिम : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, याचा अस्थमा रुग्णांना अधिकचा धोका असतो. त्यामुळे आरोग्याची अधिक काळजी घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

वातावरणातील बदलामुळे विविध आजार उद्भवत आहेत. अस्थमा रुग्णांसाठी बदलते वातावरण त्रासदायक असते. परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग आणि त्यात रोगराईला निमंत्रण देणारे हे वातावरण असल्याने आरोग्य जपणे आवश्यक ठरत आहे. अस्थमाचे जे जुने रुग्ण आहेत, त्यांचा त्रास वाढत आहे. रुग्णालयात अशा रुग्णांची संख्याही वाढलेली दिसून येते.

०००००

प्रतिकारशक्ती कमी

अस्थमा रुग्णांची तुलनेने प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे इतर आजारांची लवकर लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना इतर जंतूंचा धोका जास्त असतो. सध्या व्हायरल इन्फेक्शन असल्याने सर्दी, खोकला, ताप यासह इतर आजारांचे रुग्ण वाढलेले आहेत.

००००

बालकांमध्ये अस्थमा

अस्थमा हा केवळ वयोवृद्धांना नाही, तर युवक व लहान मुलांनाही याचा त्रास होतो. जिल्ह्यात पाच वर्षांपासूनच्या काही मुलांवर सध्या अस्थमाचा उपचार सुरू आहे.

०००००

ही घ्या काळजी

कुठल्याही परिस्थितीत डाॅक्टरांनी दिलेले नियमित वापराचे औषध बंद करू नका. कोणत्याही परिस्थितीत आपले औषध वेळेवर घेणे महत्त्वाचा उपाय आहे.

ॲलर्जीकारक वस्तूंशी संपर्क टाळा. अनेकदा दम्याबरोबर ॲलर्जिक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉईड स्प्रे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करा.

०००००

तज्ज्ञ म्हणतात...

ढगाळ वातावरणात अस्थमाचे रुग्ण आहेत, यांना ॲलर्जी, रिॲक्शन येणे असा त्रास होतो. त्यात दम्याचे प्रमाणही वाढत आहे. सध्या व्हायरल इन्फेक्शनसुद्धा आहे. त्यामुळे इतर जंतूंचे प्रमाण या रुग्णांवर लवकर अटॅक करतात. त्यामुळे रुग्णांनी वेळीच उपचार घ्यावे.

- डॉ. प्रवीण ठाकरे

छातीरोग तज्ज्ञ, वाशिम