बालक दिनानिमित्त वाशिमच्या शालेय विद्याार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:41 PM2017-11-14T13:41:11+5:302017-11-14T13:41:44+5:30

वाशीम : भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे अर्थात बालकदिनाचे औचित्य साधुन  एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थींना पर्यावरण रक्षणाची शपथ १४ नोव्हेंबर रोजी देण्यात आली.       

Child day, students took oath of environmental protection | बालक दिनानिमित्त वाशिमच्या शालेय विद्याार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

बालक दिनानिमित्त वाशिमच्या शालेय विद्याार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

Next
ठळक मुद्दे एस.एम.सी.इंग्लिश स्कुलचा उपक्रम  

वाशीम : भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे अर्थात बालकदिनाचे औचित्य साधुन  एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरीत सेनेच्या विद्यार्थींना पर्यावरण रक्षणाची शपथ १४ नोव्हेंबर रोजी देण्यात आली.                 

  पर्यावरण  संतुलन कायम राखण्यासाठी वृक्ष लागवडी सोबतच त्यांचे संवर्धन आवश्यक असल्याचे महत्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य मीना ऊबगडे  यांची प्रमुख ऊपस्थीती होती. यावेळी राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी विद्यार्थींना पर्यावरणाच्या दृष्टिने वृक्षांना असलेले महत्व समजावून सांगितले .त्यानंतर विद्यार्थींना पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली. वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करन्याची ग्वाही यावेळी ईको क्लब विद्यार्थींनी दिली. तसेच ईतरांनाही वृक्ष लागवड व संवर्धन करण्यांचे अवाहन करन्यात आले.  कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील निसर्ग ईको क्लब विद्यार्थींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Child day, students took oath of environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा