बस व टँकरचा अपघात; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:28 IST2021-07-10T04:28:03+5:302021-07-10T04:28:03+5:30

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर औरंगाबाद द्रुतगती महामार्गावर पिंपरी सरहद नजीक पुण्याहून रायपूरकडे( छत्तीसगड ) खाजगी प्रवासी बस ...

Bus and tanker accident; One person was injured | बस व टँकरचा अपघात; एक जण जखमी

बस व टँकरचा अपघात; एक जण जखमी

शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर औरंगाबाद द्रुतगती महामार्गावर पिंपरी सरहद नजीक पुण्याहून रायपूरकडे( छत्तीसगड ) खाजगी प्रवासी बस क्रमांक सी.जी.१९ एफ ०२८१ जात होती व मेहकरकडे सिमेंट केमिकल घेऊन ९ जुलै रोजी सकाळी पाच ते साडेपाच वाजता दरम्यान एम. एच. ४० बी.जी. ५७०७ टँकर महामार्गाने जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेले बाभळीचे झाड अचानकपणे रस्त्यावर पडले. त्यामुळे सरहद पिंपरी गावानजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये लक्झरी बसचा चालक जखमी झाल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली. या अपघातामुळे मालेगाव मेहकर रस्त्यावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बांगर व त्यांचे सहकाऱ्यांनी घटनास्थळी रवाना होऊन जखमीला उपचारासाठी दवाखान्यात पाठविले. व वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Bus and tanker accident; One person was injured