शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच सचिवाकडे पाच गावांच्या कामाचा बोजा

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.

पांडवउमरा : वाशिम पंचायत समितींतर्गत येणार्‍या ग्रामसचिवांकडे समान गावांची जबाबदारी सोपविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. काही ग्रामसचिवांकडे तीन ते पाच गावांची जबाबदारी तर काही ग्रामसचिवाकडे केवळ एकाच गावाचा स्वतंत्र कारभार दिल्याने समानतेच्या तत्त्वाला हरताळ फासला गेला आहे.शासनाच्या कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचविण्याबरोबरच गावाचा विकास साधण्याचे काम ग्रामसचिवांकडे सोपविण्यात आले आहे. वाशिम पंचायत समितींतर्गत एकूण ८४ ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे साधारणत: ७0 च्या आसपास ग्रामसचिवांची पदे भरणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत ६१ ग्रामसचिव कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यातही तीन ग्रामसचिवांना कार्यालयीन कामकाजात गुंतविण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी प्रतिनियुक्तीवरील कर्मचार्‍यांना मुळ ठिकाणी पाठविण्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि वाशिम पंचायत समितीमध्ये मात्र जयवंशी यांच्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. पी.एल. माने नामक ग्रामसचिवाकडे सावंगा जहाँगीर, पांडवउमरा, माळेगाव, तांदळी शेवई, जनुना अशा पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे. पाच गावांचा कारभार पाहताना एकाच कर्मचार्‍यांची दमछाक होते तर काही ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार देण्यात आला आहे. यामुळे जबाबदारी सोपविताना ह्यभेदह्ण तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. प्रत्येक गाव हे सरासरी ७ किलोमीटर अंतरावर असून मुख्यालयापासून ४ गावाला दररोज भेट द्यायची झाली तर ७0 किलोमीटर जाणे-येणे असा प्रवास एका ग्रामसेवकाला करावा लागतो. शासकीय योजना लवकर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कामाचे समान वाटप होणे आवश्यक असताना अनेक ग्रामसचिवांकडे केवळ एकाच गावांचा कारभार असल्याने उर्वरीत ग्रामसचिवांकडे प्रकरणांच्या ह्यपेंडींगह्णची संख्या वाढत चालली आहे. तीन ग्रामसचिव कार्यालयीन कामकाजासाठी घेण्यात आले आहेत. त्यामुळे ५८ ग्रामसेवकांना ८४ ग्रा.पं.ींचा कारभार सांभाळावा लागत आहे. कार्यालयीन कामकाजात तीन ग्रामसचिवांना घेतले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांना मूळ पदावर जाण्याचे फर्मान सोडूनही पं.स.प्रशासन आपल्याच निर्णयावर ठाम राहत असल्याचे दिसून येत आहे.