शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाला करायचेय काही तरी हटके

By admin | Updated: November 5, 2016 02:09 IST

शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे प्रस्थ निर्माण केले आहे.

प्राजक्ता चिटणीस
मुंबई- शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये स्वत:चे प्रस्थ निर्माण केले आहे. आता ‘रॉक आॅन 2’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. एवढेच नव्हे, तर या चित्रपटातील काही गाणीदेखील तिने गायली आहेत. या चित्रपटाबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...
‘रॉक आॅन’ या चित्रपटाची तू फॅन असल्याने चित्रपटाच्या सिक्वलमध्ये तुला घेण्यात यावे, असे तुला वाटत होते. त्यामुळे तू स्वत: निर्मात्यांना संपर्क साधला, असे म्हटले जात आहे, हे खरे आहे का?
मी ‘रॉक आॅन’ हा चित्रपट माझ्या कुटुंबीयांसोबत पाहिला होता. त्या वेळीच मला हा चित्रपट इतका आवडला होता, की या चित्रपटाचा सिक्वल आला, तर मला या चित्रपटात काम करायचे आहे, असे मी तेव्हाच सगळ्यांना सांगितले होते. या चित्रपटाच्या सिक्वलची ज्या वेळी चर्चा सुरू झाली, तेव्हा मी स्वत:हून निर्मात्यांना फोन करून मला या चित्रपटाबाबत तुम्हाला भेटायचे आहे, असे सांगितले. त्यावर या चित्रपटातील मी साकारत असलेली व्यक्तिरेखा जी कोणी अभिनेत्री साकारेल त्या अभिनेत्री त्या चित्रपटातील तिची गाणीदेखील गावी, असे आधीच ठरले असल्याने मी अभिनयासोबत या चित्रपटात गायन करावे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी यशराज स्टुडिओत जाऊन गाणी गायली आणि अशाप्रकारे मी या चित्रपटाचा भाग बनले.
तुला गाण्याची केवळ आवड आहे की तू गाणे शिकलेदेखील आहेस?
माझे आईचे वडील म्हणजे माझे आजोबा पंढरीनाथ कोल्हापुरे हे प्रसिद्ध शास्त्रीय
गायक आणि संगीतकार होते. मी लहानपणी त्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. तसेच मी काही वेळा आईसोबतही गात असे. मला गाताना एक वेगळाच आनंद मिळतो. मन एकदम शांत झाल्यासारखे वाटते. त्यामुळे गाणे ही गोष्ट मला मनापासून आवडते. माझ्या चित्रपटात मला गाण्याची संधी मिळत आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते.
तू रियाजासाठी वेळ कसा काढतेस?
सध्या तरी मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असल्याने मला रियाजासाठी वेळ मिळत नाही. पण, तरीही मी वेळ काढण्याचा प्रयत्न करते. मी आठवड्यातील काही दिवस तरी व्हॉइज एक्सरसाइज करते. ‘रॉक आॅन’ चित्रपटातील गाणी गायच्या आधी मी सॅमन्था अ‍ॅडव्हडर््स यांच्याकडून व्हॉइज ट्रेनिंग घेतली होती. कारण पाश्चिमात्य संगीत कधी मी शिकले नसल्याने या चित्रपटातील गाणी गाणे माझ्यासाठी अवघड होते. पण, ही गाणी रेकॉर्ड करताना मी खूप एन्जॉय केले.
तुला अभिनेत्रीच बनायचे आहे, असे तू कधी ठरवलेस?
मला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. माझ्या वडिलांचे शोचे अतिशय रंगीबेरंगी कोट घरात असायचे ते मी घालून आरशासमोर अभिनय करायचे, नाचायचे. या सगळ्यामुळे मी चित्रपटसृष्टीतच करिअर करणार, याची माझ्या कुटुंबीयांना चांगलीच कल्पना होती.
चित्रपट निवडताना वडिलांकडून काही सल्ला घेतेस का?
माझ्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट आली, की ती अनेक वेळा माझे वडीलदेखील वाचतात. त्यांना अनेक वर्षांचा अनुभव असल्याने मला त्यातील छोट्या-छोट्या गोष्टीदेखील समजवून सांगतात. ते मला सल्ला नक्कीच देतात. पण मी निर्णय काय घ्यावा, हे मी स्वत:च ठरवावे, असे त्यांचे म्हणणे असते.
तुझे वडील एक प्रसिद्ध कॉमेडीयन आहेत, तू कधी कॉमेडी करायचा विचार नाही केलास का?
माझ्या वडिलांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील त्यांनी साकारलेला गोगो, राजा बाबू, सत्ते पे सत्ता या चित्रपटातील त्यांच्या व्यक्तिरेखा मला खूप आवडतात. त्यांच्याप्रमाणे कॉमेडी करायला मला नक्कीच आवडेल. एखादी चांगली पटकथा आल्यास प्रेक्षकांना माझे एक वेगळे रूपदेखील पाहायला मिळेल.