शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

‘पेड न्यूज’ विषयी दक्षता बाळगा!

By admin | Updated: September 21, 2014 22:40 IST

वाशिम जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे आवाहन: ‘एमसीएमसी’ ची बैठक.

वाशिम : निवडणूक कालावधीत इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे होणार्‍या प्रचाराबारोबर पेडन्यूजसारख्या प्रकारांबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी छापण्यात येणार्‍या जाहिराती, फलक, पत्रके याच्या मजकूराचीही काटेकोरपणे तपासणी व्हावी, असे मत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मिडीया सर्टिफिकेशन अँन्ड मॉनिटरींग कमिटी (एमसीएमसी) च्या बैठकीत मार्गदर्शन करतांना कुळकर्णीे बोलत होते. माध्यमांद्वारे होणार्‍या प्रचारावर लक्ष ठेवणे हे ह्यएमसीएमसीह्ण चे काम आहेच, त्याचबरोबर उमेदवारांकडून देण्यात येणार्‍या पेडन्यूजबाबतही या समितीला महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. उमेदवारांकडून देण्यात येणार्‍या जाहिराती, मतदारांना करण्यात येणारे आवाहन यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबतही एमसीएमसीच्या सदस्यांनी सतर्क रहावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. निवडणूक कालावधीत प्रसिध्दी होणार्‍या प्रत्येक बातमीवर कमिटीच्या सदस्यांनी लक्ष ठेवून पेडन्यूजचे प्रकार उघडकीस आणावेत. याबाबत दैनंदिन अहवाल तयार करुन पेडन्यूजसारखे प्रकार घडल्यास पुढील कारवाईही तातडीने करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी केली. सदर बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी प्रास्ताविक करुन मिडीया सर्टिफिकेशन अँन्ड मॉनिटरींग कमिटी स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला.