बंजारा बांधवांचा तिजोत्सव उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:10+5:302021-09-05T04:48:10+5:30

आपल्या वैविध्यपूर्ण परंपरेने ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाच्या पिढी परंपरेनुसार चालत आलेला तिजोत्सव ३० व ३१ ऑगस्ट रोजी कारंजा शहरातील ...

Banjara brothers celebrate Tijotsav with enthusiasm | बंजारा बांधवांचा तिजोत्सव उत्साहात साजरा

बंजारा बांधवांचा तिजोत्सव उत्साहात साजरा

आपल्या वैविध्यपूर्ण परंपरेने ओळखल्या जाणाऱ्या बंजारा समाजाच्या पिढी परंपरेनुसार चालत आलेला तिजोत्सव ३० व ३१ ऑगस्ट रोजी कारंजा शहरातील बंजारा काॅलनी परिसरात असलेल्या वसंतराव नाईक सभागृहात नायक व कारभारी यांच्या हस्ते तिज (ज्वारा) चे पूजन करून साजरा करण्यात आला.

दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासाने व मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा बंजारा समाजातील तिजोत्सव हा यावर्षी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने वसंतराव नाईक सभागृह नजीकच समाजाचे पारंपरिक नृत्य करून साजरा करण्यात आला. नारळीपाैर्णिमेला सायंकाळी तांड्याचे नायक यांचे घरी समाजातील तरूणी ह्या जमतात व तिजची पेरणी करतात. व त्यानंतर १० दिवस तिज अर्थात ज्वारा पेरून कुमारिका मुली ह्या दररोज सकाळ संध्याकाळ पाणी टाकून तिजची पूजा करतात. व गोकुळ अष्टामीला तिजेची तोडणी करतात. या कालावधीत मोठ्या झालेल्या ज्वाराची तोडणी झाल्यानंतर विसर्जनाकरिता निघालेल्या मिरवणुकीत कुमारिका मुली व महिला ह्या हातात ज्वाराच्या टोपल्या घेऊन मिरवणुकीत नृत्य करतात. परंतु यावर्षी कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून तिजची मिरवणूक न काढता समाजातील मुली व महिला यांनी पारंपरिक वेषभूषा परिधान करून सभागृह परिसरातच नृत्य केले . तसेच कारंजा तालुक्यातील गिर्डा येथे सुध्दा बंजारा समाजाचा तिज उत्सव २२ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान साजरा करण्यात आला. या उत्सवात गावातील तसेच कारंजा शहरातील अनेक समाजबांधव सहभागी झाले होते.

Web Title: Banjara brothers celebrate Tijotsav with enthusiasm