शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदाचे ढोंगी मायाजाल’

By admin | Updated: June 28, 2014 01:40 IST

‘उल्लु बनाविंग’: दुर्मीळ जडीबुटीच्या पदराआड सामान्यांची लूट, वाशिम जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षच!

नागेश घोपे/ वाशिम
पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत ह्यबोगस वैदुगिरीह्ण ला ऊत आला आहे. कौटुंबिक, शारिरिक तथा मानसिक व्याधींनी त्रस्त असलेल्या अंधश्रद्धाळू लोकांना आयुर्वेदाच्या पदराआड ह्यउल्लुह्ण बनवायचे अन् त्यांच्याकडुन वारेमाप पैसा उकळायचा या प्रवृत्तीेने ह्यबोगस वैदुगिरीह्ण च्या धंद्याला दिवसागणिक बरकत आणली आहे. आपल्याकडे सर्वच आजारांचा रामबाण इलाज असल्याचा दावा करणार्‍यांच्या अघोरी उ पचारांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान मात्र, धोक्यात आणले आहे. लोकमतने केलेल्या स्टिंगमधून बोगस वैदुगिरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
दिवसागणिक गंभिर आजारांचे प्रमाण वाढत चालले आहेत. नाना प्रकारची व पॅथींची औषध घेवूनही काही आजार बरे होत नाहीत. परिणामी, रूग्ण अस्वस्थ होतो. नेमकी हीच संधी साधून बोगस वैदू आपले उखड पांढरे करून घैत आहेत. ह्यआजार बरा झाल्यावरच पैस द्याह्ण असे प्रारंभी छा तीठोकपणे सांगायचे नंतर औषधी तयार करण्याच्या नावावर रूग्णांकडुन पैसे उकडायचा असे या बोगस वैदुंचे कारनामे असुन वाशिम शहरात गत आठवड्यापासून यांनी चांगलाच धुडगुस घातला आहे. लोकमतने २७ जूनला केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून या बोगस वैदुंचा भांडाफोड केला. शहरातील टिळक बगिच्यासमोर जडीबुटीच्या नावावर सुरू असेलल्या दुकानदारीतून रूग्णांची कश्या प्रकारे पिळवणूक होते ही बाबही या स्टिंगमधून अधोरेखित झाली आहे.


**बोगस वैंदुवर व जडीबुटी विकणार्‍यांवर कारवाई करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला नाही. तर जिल्हाधिकार्‍यांच्या अधिनस्त नियु क्त केलेली समिती बोगस डॉक्टर तथा वैदुंवर कारवाई करू शकते. परंतु त्यासाठी सदर समितीकडे तक्रार करणे गरजेचे असते. ग्रामिण भागातीलच नव्हे तर शहरी भागात राहणारे शिक्षित लोकही अश्या भोंदुवेैदुची तक्रार करण्यास धजावत नाहीत. यातूनच यांचे चांगलेच फावते

**आयुर्वेदात कुठल्याही आजारावर उपचार आहे. परंतु सदर उपचार तंत्रशुद्ध व प्रमाणबद्धपणे होणे गरजेचे आहे. त्या साठी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास करावा लागतो. परंतु काही बोगस वैदु आपली दुकानदारी चालविण्यासाठी आयुर्वेदाचा खोटा आधार घेऊन जडीबुटी विकतात. हा प्रकार आयुर्वेदाला बदनाम करणारा व लोकांची लुबाडणूक करणारा आहे.
- डॉ. दीपक ढोके,
आयुर्वेद तज्ज्ञ