माकडाच्या हल्ल्यात आणखी एक जखमी

By Admin | Updated: December 3, 2014 01:35 IST2014-12-03T01:35:21+5:302014-12-03T01:35:21+5:30

येडशी येथे मागील महिनाभरापासून माकडाचा हैदोस.

Another injured in Monkey attack | माकडाच्या हल्ल्यात आणखी एक जखमी

माकडाच्या हल्ल्यात आणखी एक जखमी

मंगरुळपीर (वाशिम) :आदर्श ग्राम येडशी येथे मागील महिनाभरापासून एका माकडाने हैदोस घातला असून रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून झोपेत अचानक नागरिकांवर हल्ला चढवित असल्याचा प्रकार घडत आहे. माकडाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोन मुलींसह पाच जण जखमी झाले आहेत; परंतु संबंधीतांकडून बंदोबस्त करण्यात न आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत महिन्याभरापासून रात्रीच्या वेळी धुमाकुळामुळे नागरिकांची झोप उडाली असून, रात्रीला घराच्या बाहेर पडणे कठीण झाले आहे.दिवसभर गावाबाहेरील झाडावर वास्तव्य करून रात्री हल्ला करीत असल्याचा प्रकार महिनाभरापासून चालु आहे. १ डिसेंबरच्या रात्री १0 वाजता सदर माकडाने प्रवीण भगवान बारड यांच्या घरात प्रवेश करून झोपेत असताना नाकावर हल्ला करून गंभीर जखमी केले .बारड यांनी अकोला येथे जावुन उपचार करून घेतले. नाकावरील जखमेवर सहा टाके लागले आहेत.

Web Title: Another injured in Monkey attack