शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईसदृश परिस्थितीवर प्रशासनाची नजर

By admin | Updated: March 18, 2015 01:54 IST

वाशिम जिल्ह्यातील बहुतांश कामे पूर्ण; सहा गावांना विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू.

वाशिम : जिल्हय़ात गतवर्षी झालेल्या अपुर्‍या पर्जन्यमानामुळे उद्भवणारी संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने सन २0१४-१५ या उन्हाळय़ाकरिता एकूण ४३९ गावांकरिता ६0१ विविध उपाय योजनांचा ५४७. ९८ लक्षच्या टंचाई कृती आराखड्यास मंजुरी प्रदान केली आहे. या मंजुरीनुसार विविध उपाय योजनांकरिता आवश्यक मंजुरी घेऊन अनेक कामांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन विंधन विहिरींची कामे पुर्णत्वास तर जिल्हय़ातील सहा गावांकरिता आठ खासगी विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासह विविध कामेही पूर्ण तर काही पुर्णत्वाकडे आहेत.संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रस्तावित सर्व गावांचे व स्थळ निश्‍चितीची कामे पूर्ण झाली असून, ५१ नवीन विंधन विहिरींपैकी जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. नळ योजना दुरूस् तीची कामे प्रगतीपथावर असून, बहुतांश कामे झाली आहेत. सद्यस्थितीत एकाही गावात भीषण पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली नसल्याने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्या त आलेला नाही. मंजूर आराखड्यातील प्रस्तावित ९३ गावातील ९५ टँकरपैकी सद्यस्थितीत एकही टँकर लावण्याची अद्याप आवश्यकता पडली नसल्याने ते लावण्यात आलेले नाहीत. खासगी विहिरीचे अधिग्रहण करणे अंतर्गत सहा गावाकरिता आठ विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून, यामध्ये वाशिम व कारंजा तालुक्यातील प्रत्येक तीन गावांचा समावेश आहे. जिल्हय़ातील सहाही तालुक्यांमध्ये नवीन विंधन विहिरी खोदकामे पूर्ण झाली, त्यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील नऊ, मालेगाव सात, रिसोड ११, मानोरा सहा, कारंजा दोन व वाशिम तालुक्यातील तीन गावांतील विहिरींचा समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण नऊ प्रादेशिक नळ योजनांचा समावेश नळ योजना विशेष दुरूस्तीस या उपाय योजनेत करण्यात आला. मंजूर आराखड्यातील प्रस्तावित १0८ गावातील १0९ विहीर खोलीकरणपैकी सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीस सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.