शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

एकबुर्जी धरण उंचीचा प्रस्ताव गुंडाळला

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे.

वाशिम: वाशिम शहराची तहान भागविणार्‍या आणि शेकडो शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारणार्‍या तालुक्यातील एकबुर्जी धरणाची भिंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाने तूर्तास गुंडाळून ठेवला आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविला होता. धरणात पाणी कुठून आणणार, असा मुद्दा उपस्थित करून तू र्तास हा मुद्दा उपस्थित न करण्याच्या सूचनाही मंत्रालयस्तरावरून मिळाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. वाशिम शहराची संपूर्ण तहान एकबुर्जी धरणाच्या पाण्यातून भागविली जाते. याबरोबरच एकबुर्जी परिसरातील शेकडो शेतकर्‍यांना या धरणातून सिंचन करणे सुलभ झाले. पावसाळ्यात धरण ह्यओव्हर फ्लोह्ण झाल्यानंतर पाणी वाहून जाते. धरणातील जलसाठय़ात वाढ करण्यासाठी भिंतीची उंची वाढविण्याची मागणी गत १५ वर्षांं पासून शासनदरबारी रेटून धरली जात आहे; मात्र आता धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी पाणी कुठून आणणार? असा प्रतिप्रश्न करून मंत्रालयीन बैठकीत हा प्रस्ताव तूर्तास गुंडाळण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे १८ डिसेंबरला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार्‍या बैठकीतून हा मुद्दा गायब होणार आहे.