अभय योजनेतून मिळणार विजबिलात ५ टक्के सूट!

By Admin | Updated: November 6, 2016 21:36 IST2016-11-06T21:36:04+5:302016-11-06T21:36:04+5:30

महावितरणने अभय योजना अंमलात आणली असून मूळ बिलात ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे.

Abhay Yojna will get 5 percent discount! | अभय योजनेतून मिळणार विजबिलात ५ टक्के सूट!

अभय योजनेतून मिळणार विजबिलात ५ टक्के सूट!

>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 6 - विजेची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालल्याने महावितरण आर्थिकदृष्ट्या डबघाईस आले आहे. त्यावर उपाययोजना म्हणून महावितरणने अभय योजना अंमलात आणली असून मूळ बिलात ५ टक्के सुट मिळण्यासोबतच व्याज व दंडाची १०० टक्के रक्कम माफ केली जाणार आहे. 
वाढलेल्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या ३१ मार्च २०१६ व त्याआधीच्या कृषी व पाणीपुरवठा वर्गवारीतील ग्राहक वगळता इतर सर्वांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. 
याअंतर्गत योजना लागू झाल्यापासून एका महिन्याच्या आत जे ग्राहक योजनेचा फायदा घेवून देयक अदा करतील, त्यांना मूळ थकबाकीच्या केवळ ९५ टक्केच रक्कम अदा करावी लागणार आहे. थकबाकीवर आकारण्यात आलेले व्याज आणि दंड यामध्ये १०० टक्के सुट; तर मुळ थकबाकीमध्ये  ५ टक्के सुट दिली जाणार आहे. 
१ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये योजनेत सहभाग घेणाºया ग्राहकांना १०० टक्के दंड व व्याजापासून मुक्ती मिळणार आहे. १ फेब्रुवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत योजनेत भाग घेणाºया ग्राहकांना व्याजातून ७५ टक्के सुट मिळणार असून मूळ थकबाकी आणि योजनेत सहभागी होईपर्यंतच्या तारखेपर्यंत लागणारे २५ टक्के व्याज भरावे लागणार आहे. अभय योजनेच्या माध्यमातून थकबाकीदार ग्राहकांनी देयक अदा करून पुर्ववत वीजपुरवठा सुरू करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.  
" वाशिम जिल्ह्यात महावितरणचे एकंदरित २ लाख १९ हजार ५६६ ग्राहक आहेत. त्यात घरकुती ग्राहकांची संख्या १ लाख ५२ हजार ८८६ आहे. आॅगस्ट-सप्टेंबर महिण्यापर्यंत या ग्राहकांपैकी थकबाकीदार ग्राहकांकडे १९.४५ कोटी रुपये थकबाकी होती. त्यांनी अभय योजनेचा लाभ घेवून थकबाकीमधून मुक्ती मिळवायला हवी," असे महावितरण, वाशिमचे उपअभियंता अतुल देवकर यांनी सांगितले. 
 

Web Title: Abhay Yojna will get 5 percent discount!