८३ क्विंटल तांदूळ पकडला

By Admin | Updated: September 18, 2015 00:19 IST2015-09-18T00:19:05+5:302015-09-18T00:19:05+5:30

रिसोड पोलीसांची कारवाई; अज्ञात रेशनमाफिया विरूद्ध गुन्हा दाखल.

83 quintals of rice | ८३ क्विंटल तांदूळ पकडला

८३ क्विंटल तांदूळ पकडला

रिसोड (जि. वाशिम): स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून रिसोड पोलिसांनी बुधवारी रात्री ८ वाजतादरम्यान छापा मारला. यावेळी ८३ क्विंटलच्या आसपास तांदूळ बेवारस स्थितीत आढळून आल्याने १७ सप्टेंबरला अज्ञात इसमाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. बुधवारच्या रात्रीदरम्यान रेशनमाफिया बाजार समितीच्या आवारातून शासकीय तांदूळ उचल करणार असल्याची माहिती खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाली होती. ठाणेदार एम.ए. रऊफ यांच्या मार्गदर्शनात रेशनमाफियाला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला असताना, याची कुणकुण रेशनमाफियाला लागल्याने तांदूळ जागेवर सोडून ते पसार झाले. यावेळी ८३ क्विंटल शासकीय तांदूळ पोलिसांनी जप्त करून शासकीय गोदामात ठेवला आहे. अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 83 quintals of rice