डिक्कीतून ५५ हजार लंपास

By Admin | Updated: April 11, 2015 01:45 IST2015-04-11T01:45:36+5:302015-04-11T01:45:36+5:30

वाशिम पंचायत समिती परिसरातील घटना.

55 thousand lamps from Dikki | डिक्कीतून ५५ हजार लंपास

डिक्कीतून ५५ हजार लंपास

वाशिम : येथील पंचायत समिती परिसरात असलेल्या गटसाधन केंद्रासमोर दुचाकीच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने रोख ५५ हजार रुपये लंपास केले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाशिम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील बबन ग्यानुजी शेंडगे (५३) हे पंचायत समितीमध्ये काही कामानिमित्त आले होते. यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये रोख ५५ हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे ठेवली होती.

Web Title: 55 thousand lamps from Dikki