शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राचे ग्रामीण रु ग्णालयात रूपांतर कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:07 IST

सुविधांअभावी परळीतील रुग्ण त्रस्त : आॅगस्ट महिन्यात मिळाली होती मंजुरी; आरोग्य केंद्रातील काही पदे रिक्त

वाडा : वाडा तालुक्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागातील परळी हे आरोग्य केंद्र. या केंद्रात रुग्णांची मोठी गर्दी असून या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावाला आॅगस्ट महिन्यात मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही हे आरोग्य केंद्र आहे तसेच असून दिवसेंदिवस येथे येणाऱ्या रुग्णांची सुविधांअभावी परवड होत आहे.

२० हजार लोकसंख्येला साधारणत: एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. मात्र, परळी आरोग्यकेंद्राअंतर्गत तब्बल ६५, ६०३ इतकी लोकसंख्या आहे. तर २ हजार लोकसंख्येला उपकेंद्र असायला हवे. पण प्रत्यक्षात येथे १० हजार एवढ्या लोकसंख्येला एक उपकेंद्र आहे. साहजिकच हा भार सहन करण्याची क्षमता आरोग्यकेंद्रात नाही. मात्र तरीही परळी आरोग्य केंद्र रु ग्णांना सेवा देत आहे.वाडा ग्रामीण रुग्णालयानंतर त्रिंबकेश्वर मार्गावरील परळी हे लोकांना आरोग्य सेवा देणारे एकमेव केंद्र आहे. यावर असलेला लोकसंख्येचा भार लक्षात घेता ५ आॅगस्ट २०१९ रोजी परळी आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होण्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र अद्यापही याबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसते आहे.परळी आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्यास सहाजिकच सुसज्ज इमारत, सोयीसुविधा, तज्ञ वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग, शस्त्रक्रिया विभाग, एक्स - रे विभाग, रक्तपेढी अशा अनेक सेवा लोकांना उपलब्ध होतील. शिवाय, वाडा आणि ठाणे येथे उपचारांसाठी जाण्याची जोखीमही कमी होईल.सध्या परळी आरोग्य केंद्रात २०० च्या आसपास ओपीडी असून महिन्याला २० ते २५ महिलांची प्रसूती होत असते. असे असले तरी येथे ५ आरोग्य सेविका, मानिवली येथे आरोग्य सेवक तर अन्य पदे रिक्त आहेत. रुग्णांना सेवा देण्यावर याचा परिणाम होत असतो. शिवाय, आरोग्य केंद्राच्या इमारतीतही अनेक समस्या असून विजेची कामे तातडीने करणे गरजेचे आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ. यतिष पाटील यांनी सांगितले.ग्रामीण रुग्णालय उभारणे हा खरेतर वरिष्ठ पातळीवरील विषय असून आरोग्य केंद्र अन्य जागी हलविणे आणि आरोग्य केंद्राची जागा ग्रामीण रु ग्णालयाला स्थलांतरित करणे ही एक प्रक्रि या आहे. याबाबत एक ठराव पंचायत समितीच्या बैठकीत घेतला जाईल, मग याबाबत पुढील कार्यवाही होईल.- डॉ. संजय बुरपल्ले, तालुका आरोग्य अधिकारी

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHealthआरोग्य