शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार पालिकेची महासभा आज

By admin | Updated: July 8, 2015 22:15 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली महासभा उद्या होत आहे. गेल्या ५ वर्षांत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांचे नाते विळ्याभोपळ्याचे राहिले.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली महासभा उद्या होत आहे. गेल्या ५ वर्षांत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांचे नाते विळ्याभोपळ्याचे राहिले. विकासकामांच्या प्रश्नांवर अनेकदा संघर्ष उद्भवले, सभात्याग झाले. परंतु, त्यामध्ये कटुता नव्हती. सभागृहामध्ये लोकहिताच्या कामांसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणारे नगरसेवक सभागृहाबाहेर मात्र एकमेकांशी खेळीमेळीने वागत असत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. पूर्वी सभागृहात २७ ते २८ विरोधी पक्षाचे नगरसेवक होते. आता ही संख्या ७ वर आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक सत्ताधारी पक्षाच्या कारभारावर कसा अंकुश ठेवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उद्या होणाऱ्या महासभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडेल, असा अंदाज आहे. यंदा सभागृहात ८० टक्के नवे चेहरे आहेत. एकूण ११५ नगरसेवकांपैकी ५७ महिला नगरसेविका आहेत. त्यापैकी बहुजन विकास आघाडीच्या भारती देशमुख, छाया पाटील व सेनेच्या किरण चेंदवणकर या तीन अनुभवी नगरसेविका, तर उमेश नाईक, पंकज ठाकूर, सुदेश चौधरी, प्रशांत राऊत, भरत मकवाना, संदीप पाटील, रमेश घोरकना, रूपेश जाधव व सीताराम गुप्ता असे नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. उर्वरित १०३ नगरसेवक महानगरपालिकेत प्रथमच निवडले गेले. सभागृहातील बलाबल लक्षात घेता सत्ताधारी पक्षाच्या निर्णयाला फारसा विरोध होण्याची शक्यता नाही. नुकत्याच पार पडलेल्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये १०८ विरुद्ध ६ असे मतदान झाले होते. तेव्हा एक नगरसेवक गैरहजर होता. विरोधी पक्षाची संख्या लक्षात घेता यंदा विरोधी पक्षनेतेपद निर्माण करणे कठीण असून हा तिढा प्रशासन कसा सोडवते, यावर सारे काही अवलंबून आहे. आज बहुजन विकास आघाडीचे आ. क्षितिज ठाकूर, आ. हितेंद्र ठाकूर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये सभागृहातील कामकाजात भाग घेणे तसेच महानगरपालिका अधिनियमांचा अभ्यास करणे, विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, या तीन विषयांवर शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेना-भाजपा युतीचे केवळ ६ नगरसेवक आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे ५ नगरसेवक आहेत.विरोधी पक्षनेतेपद निर्माण करण्याबाबत सत्ताधारी पक्षाने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर ते पद शिवसेनेच्या किरण चेंदवणकर यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)