शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात विनामास्क एसटी प्रवासी वाहतूक; ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:03 IST

‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ घोषवाक्याला तिलांजली

खोडाळा : प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे चांगले सहकार्य यामुळे कोविड-१९चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी झाला होता. तथापि, कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळूहळू शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र, मास्क वापरणे बंधनकारकच होते. ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हे शासनाचे धोरण असले तरी सार्वजनिक ठिकाणी  तथा प्रवासात त्याचा काटेकोर अवलंब होताना दिसत नसल्याने जनतेची बेफिकिरी दिसून येत आहे. 

कोविड-१९चे लसीकरण  अद्याप पूर्ण  झालेले नाही. मोखाडा तालुक्यात आणि प्रामुख्याने खोडाळा बाजारपेठेत रुग्ण दगावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मास्कचा नियमित वापर हाच सध्या तरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. म्हणूनच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये मास्कचे महत्त्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ मोहीम  प्रभावी रीतीने राबविण्यात येत आहे. परंतु त्याबाबत लोक दुर्लक्ष करीत आहेत. 

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला मास्क वापराचे महत्त्व पटवून देणे तसेच कोणत्या प्रकारचा मास्क वापरावा, मास्कचा वापर कशा पद्धतीने करावा तसेच त्याची विल्हेवाट कशा रीतीने लावावी याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. असे असले तरीही प्रवासी, व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे स्थानिक व तालुका प्रशासनाने त्यावर खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार