शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाक्यांना दंड, रिक्षांना अभय

By admin | Updated: October 7, 2016 05:00 IST

नायगाव परिसरात रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने नव्या

वसई : नायगाव परिसरात रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या मोटार सायकलस्वारांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. तर बेकायदा रिक्षांवर कारवाई होत नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नायगाव पश्चिमेला पार्किंगसाठी जागा अतिशय अपुरी असल्याने मोटारसायकली आणि चारचाकी गाड्या रस्त्यालगत ठेऊन शेकडो लोक जातात. या गाड्या पहाटेपासून रात्रीपर्यंत रस्त्यावर बेवारसपणे ठेवल्या जातात. जागा नसल्याने वाहनचालक आपल्या महागड्या गाड्या रस्त्या कडेला कित्येक वर्षांपासून ठेवत आहेत. त्यातच जुलै महिन्यापासून कोसळलेल्या पावसामुळे नायगाव रेल्वे पार्किंगमध्ये पूर्ण पाणी साचून राहिले आहे. तसेच येथे पर्यायी पार्किंग जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला आपली वाहने पार्किंग करू लागला आहे. गेल्या महिन्यापासून वाहतूक पोलिसांनी यावर कारवाई करीत दंड’ वसूल करायला सुुरुवात केली आहे. रात्री कामावरून परतलेल्या चाकरमान्यांना याचा चांगलाच फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसतांना झालेली कारवाई अन्यायकारक असल्याच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. मात्र ही वाहने रस्त्याच्या कडेला काढण्यात आलेल्या सफेद पट्ट्या बाहेर असल्याच्या तक्रार असल्याने कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शिस्तबद्ध पार्किंग केलेल्या वाहनांना अनेकवेळा रिक्षाचालक मुद्दामून रस्त्यावर आणून ठेवत असल्याने प्रवासी तसेच रिक्षा चालकांमध्ये बाचाबाची होत असते. अनेकवेळा गाडयांना मुद्दाम पाडण्यात येऊन त्यांची नासधूस करण्यात येते. रिक्षा स्टॅन्ड हा रेल्वेने आरक्षित अ‍ॅम्ब्युलन्स पार्किंगमध्ये उभारला गेल्याने तो बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. राज्य सरकारकडून रेल्वे परिसरात उभी केलेली मोफत अ‍ॅम्ब्युलन्स अनेकवेळा याच रिक्षा स्टॅन्डमुळे अडकून पडत असते. तसेच रस्त्यामध्ये बेशिस्तपणाने रिक्षा उभ्या केल्या जात असतांना त्यावर वाहतूक पोलीस का कारवाई करीत नाही? असा सवाल प्रवासी वर्ग विचारू लागला आहे. (प्रतिनिधी) सगळ्यांना समान न्याय लावाच्वसई वाहतूक पोलीस निरीक्षकांनी अलीकडेच लावलेल्या सूचना फलका शेजारीच रिक्षा रस्त्यामधोमध उभ्या केल्या जात असतांनाही केवळ आपल्यावरच कारवाई का? अशी प्रवाशांमध्ये चर्चा आहे. रिक्षांमध्ये ५ प्रवासी भरून वाहतूक केली जाते त्याकडे दुर्लक्ष होते आहे. च्नेहमी दुचाकीचालकांना चौकशी तसेच दंड आकारणीला सामोरे जावे लागते. वाहतूक पोलिसांकडून सर्वांना समान न्याय देण्यात यावा याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या गेल्या आहेत. यावर कुठली कारवाई होते याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे