शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दु:खाच्या प्रसंगी दोन कुटुंबांनी जपली सामाजिक बांधिलकी; एकाच दिवशी दोन देहदान; तिघांना मिळणार जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:00 IST

या प्रेरणादायी कार्यामागे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचा सततचा प्रयत्न आणि समर्पित भूमिका महत्त्वाची ठरली. शनिवारी पार पडलेल्या या तीनही दानप्रक्रिया यशस्वी झाल्या.

नालासोपारा : सामाजिक बांधिलकी जपत, मृत्यूनंतरही समाजासाठी काही तरी देण्याची भावना जपत वसई आणि कांदिवलीतील दोन कुटुंबांनी आपल्या घरातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर देहदान आणि नेत्रदान केले आहे. या प्रेरणादायी कार्यामागे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ संस्थेचा सततचा प्रयत्न आणि समर्पित भूमिका महत्त्वाची ठरली. शनिवारी पार पडलेल्या या तीनही दानप्रक्रिया यशस्वी झाल्या.पहिल्या घटनेत कांदिवली येथील रहिवासी जितेंद्र चितलिया (८४) यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पुत्र राजेश आणि अमित चितलिया तसेच कुटुंबातील सदस्य मनीष विनोदराय गांधी यांनी देहदानासाठी पुढाकार घेत पुरुषोत्तम पवार यांच्याशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक सर्व औपचारिकता पार पाडली. मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये हे देहदान यशस्वीरीत्या पूर्ण झाले. दाेन कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन जणांना जीवदान मिळणार आहे.  

डाॅक्टरांची महत्त्वपूर्ण भूमिकासाईनगर वसईचे रहिवासी कृष्णराज पालेजा (७४) यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केवळ देहदान नव्हे तर नेत्रदान करण्याचाही निर्णय घेतला. दुःखाच्या क्षणीही समाजोपयोगी विचार करत त्यांनी घेतली सकारात्मक भूमिका महत्त्वाची ठरली. या प्रक्रियेत सागर वाघ यांच्या सहकार्याने डॉ. निकम आणि डॉ. अवधेश मिश्रा यांनी नेत्रसंकलनाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर देह नालासोपारा येथील दुबे वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. संपूर्ण समन्वयासाठी कुसुम इगी मेनेजेस आणि जॉनी मेनेजेस यांनी अथक मेहनत घेतली.

भावनिकऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन देहदानामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी मानवी शरीरशास्त्र अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात. समाजाने याकडे केवळ धार्मिक वा भावनिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून मृत्यूनंतरचे आयुष्यही अर्थपूर्ण करण्याचा विचार करून सकारात्मक पाठिंबा दिला पाहिजे, असे पुरुषोत्तम पवार म्हणाले. फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

टॅग्स :Organ donationअवयव दानhospitalहॉस्पिटल