दोन कॉलेज तरुण बुडाले

By Admin | Updated: July 18, 2015 23:08 IST2015-07-18T23:08:08+5:302015-07-18T23:08:08+5:30

येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या कामण-चिंचोटी धबधब्यात आज सकाळी पोहावयास गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला.

Two college youth lost | दोन कॉलेज तरुण बुडाले

दोन कॉलेज तरुण बुडाले

वसई : येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या कामण-चिंचोटी धबधब्यात आज सकाळी पोहावयास गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या दोघांना पोहता येत नसतानाही त्यांनी पाण्यात उडी मारली व ते १२ फुट खोल पाण्यात खेचले गेले. त्या दोघांचे मृतदेह हाती लागले असून ते शवविच्छेदन करण्याकरीता कामण प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यांत आले.
वर्तक महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळी कामण येथे सहलीकरीता आले होते. वरूण पटीदार (१९) व अनिकेत गोसावी (१९) दोघे राहणार वसई, हे पोहता येत नसताना पाण्यात उतरले, परंतु पाण्याच्या प्रवाहामुळे त्याना पुन्हा वर येणे शक्य झाले नाही व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. यापुर्वी वरूणच्या मोठ्या भावाचाही असाच बुडून मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर पटीदार कुटूंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. वरूणचे वडील हे वसईतील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये अपघात म्हणून नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Two college youth lost