शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दलाल घेताहेत वाड्यातील टोमॅटो कवडीमोल दराने

By admin | Updated: April 10, 2016 00:50 IST

तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन

- वसंत भोईर,  वाडा तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली असून उत्पन्नही भरपूर आले आहे. मात्र, या शेतपिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने व माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन शेतकऱ्यांकडे नसल्याचा फायदा दलालांनी उठवला आहे. ते मातीमोल भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करून व्यापाऱ्यांना विकत असल्याने त्यांचा धंदा तेजीत आहे. या व्यापारी अडकित्त्यात अडकलेला बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे.तालुक्यात देवघर या गावात ३० शेतकऱ्यांनी १५० ते २०० एकर जागेत टोमॅटो पिकवला आहे. तर बुधावली, गुंज, काटी, गौरापूर, बिलोशी, बिलावली, घोडमाल, पालसई, कोठे, तुसा, बोरांडा आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी या वर्षी टोमॅटो शेती केली असून त्यांना उत्पन्नही विक्रमी मिळाले आहे. मात्र, या मालाला दलाल भावच देत नसल्याने टोमॅटोची विक्री मातीमोल किमतीत होऊ लागली आहे. तालुका कृषी कार्यालय मात्र नावापुरतेच असून येथील अधिकारी कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांना पूरक होईल, अशी कोणतीही कामगिरी करताना दिसत नाहीत. कृषीसंदर्भातील अनेक योजना शासन राबवत असते. मात्र, येथील शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहोचतच नसल्याने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. सरकारी बाबू फक्त कागद व फायली रंगवून सर्वकाही आलबेल असल्याचे वरिष्ठांना कळवत असल्याने परिस्थिती बिकट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाडा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. परंतु, ती आजवर पूर्ण झालेली नसल्याने उत्पादन केलेल्या मालाला योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत देवघर येथील शेतकरी किशोर पाटील, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केली.कर्जबाजारी : एकरी एक लाख तोटाएका एकराला ५०० कॅरेट टोमॅटो निघतात. त्यासाठी २५०० ते ३००० रु.चे ५ पॅकेट बियाणे लागते. फवारणी तसेच मजुरी हा खर्च एक एकरासाठी दीड ते दोन लाख रु. येतो. ५०० कॅरेटचा माल ५० हजार रु.चा होतो. त्यामुळे एका एकराला एक लाख रु.चा तोटा या वर्षी येथील शेतकऱ्यांना झाला असल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढला आहे. टोमॅटो लागवडीसाठी सेवा सहकारी सोसायट्यांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही समस्या शेतकऱ्यांपुढे उभी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करून येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोची उत्तम शेती केली. पीकही चांगले आले, मात्र ते दलालांमार्फत विकावे लागल्याने मिळणारा नफा दलालांच्या खिशात जात आहे.