मीरा रोड : निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला ८ कोटी १० लाख रुपयांना फसवणाऱ्या व त्यांना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी भाईंदरमधून भाजपच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. शुक्रवारी तिन्ही आरोपींना मीरा रोड न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर पंजाब येथे नेण्यात आले.
निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिलेल्या १२ पानांच्या सुसाइड नोटमध्ये फसवणुकीचा उल्लेख आहे. सायबर लुटारूंनी एफ ७७७ डीबीएस वेल्थ इक्विटी रिसर्च ग्रुप नावाचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे डीबीएस बँकेचे नाव वापरले. चहल यांना बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर फायदा दिसायचा. मात्र, पैसे काढता येत नव्हते. पैसे काढण्यासाठी आणखी पैसे लागतील, असे सांगून चहल यांना लुटले.
फसवणुकीची रक्कम काही जणांच्या बँक खात्यातसायबर गुन्हे शाखेने केलेल्या तपासात फसवणुकीची रक्कम भाईंदरच्या काही जणांच्या बँक खात्यात गेल्याचे आढळले. गुरुवारी पतियाळा सायबर शाखेच्या पोलिस निरीक्षक तरणदीप कौर आणि पथक भाईंदरमध्ये आले.
पंजाब पोलिसांनी शेरा ठाकूर ऊर्फ रणजीत नंबरदार सिंग (३०), प्रतीक बाफना (३१) व आशिष कुमार संतोषकुमार पांडे (३०) यांना चौकशी केल्यानंतर अटक केली. शेरा भाजप युवा मोर्चाचा नवघर मंडळ अध्यक्ष आहे.
Web Summary : Three, including a BJP leader, were arrested in Bhayandar for allegedly defrauding a retired IPS officer of ₹8.1 million, driving him to suicide. They used a fake trading platform, luring him with profits but preventing withdrawals. The money trail led to their bank accounts.
Web Summary : एक भाजपा नेता समेत तीन लोगों को भायंदर में एक सेवानिवृत्त आईपीएस अधिकारी को 8.1 मिलियन रुपये की धोखाधड़ी करने और उसे आत्महत्या के लिए उकसाने के आरोप में गिरफ्तार किया गया। उन्होंने एक नकली ट्रेडिंग प्लेटफॉर्म का इस्तेमाल किया, जिससे उसे मुनाफे का लालच दिया, लेकिन निकासी रोक दी। पैसे के निशान उनके बैंक खातों तक ले गए।