शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

एकता परिषदेचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 01:17 IST

आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी वसई पश्चिमेकडील आदिवासींनी वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता

वसई : आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी वसई पश्चिमेकडील आदिवासींनी वसई तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. आदिवासी एकता परिषदेने या मोर्चाचे आयोजन केले. या वेळी परिषदेच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जमिनीचे प्लॉट आदिवासींच्या नावे करणे तसेच आदिवासी लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य उपलब्ध करणे, अशा दोन मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सरकारने आदिवासींच्या नावे जमिनीचे प्लॉट करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीरीत्या होत नसल्यामुळे आदिवासींत नाराजी आहे. तसेच रास्त भाव दुकानांमध्ये अन्नधान्य मिळत नसल्यामुळे आदिवासी लाभार्थ्यांना खुल्या बाजारातून अन्नधान्य विकत घ्यावे लागते. त्यामुळे आदिवासी एकता परिषदेने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता या मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चातील महिलांनी नायब तहसीलदार स्मिता गुरव यांची भेट घेऊन कैफियत मांडली. याप्रसंगी नायब तहसीलदारांनी तुमच्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठांना कळवू आणि लवकरात लवकर या मागण्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. या वेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेले मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले. (प्रतिनिधी)