शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यात पोलिसांच्या निवासस्थानांचे १० वर्षांपासून भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:10 IST

तालुक्यात ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांची पूर्ण पडझड : पोलिसांना राहावे लागते महागड्या भाड्याच्या घरांत

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. वाड्यातील पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गेल्या १० वर्षांपासून रेंगाळत पडल्याने येथील सर्वच पोलिसांवर महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.

वाडा पोलीस ठाण्यालगत पोलीस ठाण्याच्या मालकीची दोन एकरहून अधिक जागा आहे. या जागेवर ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या पोलिसांच्या निवासस्थानांची पूर्ण पडझड झाली आहे. सध्या या जागेला जंगलाचे स्वरूप आले आहे. येथे राहाण्यालायक एकही खोली सुस्थितीत नसल्याने सध्या या जागेचा उपयोग गुन्हे कामात पकडलेल्या गाड्या ठेवण्यासाठी पोलीस खात्याकडून केला जात आहे.

या ठिकाणी अस्तित्वात असलेले पोलीस अधिकाऱ्यांचे निवासस्थान व २७ हून अधिक खोल्यांची पडझड झाली आहे. उंदीर, घुशी, साप, डुकरे तसेच मोकाट जनावरे व कुत्री यांच्याकडूनच या निवासस्थानांचा सध्या उपयोग केला जात आहे.

गेल्या १० वर्षांपासून या निवासस्थानांची दुरवस्था झालेली असतानाही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवासस्थानाच्या नव्याने करावयाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केले आहे. निवासस्थानांची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी सध्या एकही पोलीस कुटुंब राहात नाही. ही निवासस्थाने सोडून येथील सर्व पोलिसांवर आज महागड्या भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या घरभाड्याच्या तिप्पट रक्कम खाजगी निवासासाठी देण्याची वेळ येथील ९५ पोलीस व पाच पोलीस अधिकाऱ्यांवर आली आहे.

जागा फायदेशीरवाडा येथे पोलिसांच्या निवासासाठी दोन एकर क्षेत्र असलेली जागा उपलब्ध आहे. ही जागा पोलीस ठाण्याच्या नावावर आहे. आहे. या जागेची सापसफाई करून या ठिकाणी भव्य निवासस्थान बांधले तर सर्वच पोलिसांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था होऊ शकते. तसेच ही जागा पोलीस ठाणे लगतच असल्याने पोलिसांसाठी ते खूप फायदेशीर ठरणार आहे.

वाडा पोलीस ठाण्याच्या नावावर असलेल्या या जागेवर हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने बांधण्याचा प्रस्ताव सुरू असून लवकरच तो मार्गी लागेल.            - सुधीर संखे, पोलीस निरीक्षक, वाडा.

सरकारी निवासस्थान नसल्याने मिळणाऱ्या पगारातील २० टक्के रक्कम घरभाड्यासाठीच जात असल्याने महिनाभराचा संसारगाडा चालविताना मोठी कसरत करावी लागते.                                   - एक पोलीस कर्मचारी