शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये शहरावर वर्चस्व गाजवणाऱ्या रावणाची लंका दहन करणार; प्रताप सरनाईकांचा मेहतांवर घणाघाती प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेने प्रचाराचा नारळ भाईंदर पूर्वेच्या बीपी रोड वरील हनुमान मंदिरात दर्शन ...

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेने प्रचाराचा नारळ भाईंदर पूर्वेच्या बीपी रोड वरील हनुमान मंदिरात दर्शन करून फोडला. यावेळी प्रचाराचा नारळ हनुमानाचा आशीर्वाद घेऊन फोडला आहे त्याच प्रमाणाने मीरा भाईंदर शहरावर वर्चस्व गाजवणाऱ्या रावणाच्या लंकेचे दहन हा हनुमान भक्त करेल असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 

भाईंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरील हे जुने हनुमान मंदिर तोडण्यासाठी वीज तोडणे, पुजाऱ्यास धमकावणे आदी प्रकार झाल्याने त्याविरोधात विविध पक्ष संघटना एकत्र आल्या होत्या.  त्यावेळी भाजपा आ. नरेंद्र मेहता व त्यांचे भाऊ यांच्यावर टॉवर बनवण्यासाठी मंदिर तोडले जात असल्याचे आरोप झाले. त्यानंतर मेहतांनी मंदिर तोडणार नसल्याचे म्हटले होते. 

आता महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी शिंदेसेनेने त्यांच्या सर्व ८१ उमेदवारांना बाळाराम पाटील मार्गावरील त्याच हनुमान मंदिर येथे नेले. त्याठिकाणी हनुमान चालिसाचे पठण व दर्शन करून प्रचार रॅलीचा नारळ मंत्री प्रताप सरनाई यांनी फोडला. यावेळी शिवसेनेच्या वचननामाची प्रत मंदिरात ठेवण्यात आली. १६ जानेवारी रोजी याच ठिकाणी विजयाचा गुलाल उधळू असे सांगत मीरा भाईंदर शहर हे  स्वतःच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीचे समजून लोकांवर वर वर्चस्व गाजविणाऱ्या 'रावणाची लंका' यंदा हा हनुमान भक्त दहन करेल असे मंत्री सरनाईक म्हणाले. 

भाईंदर पूर्वेच्या ह्या जुन्या हमुमान मंदिरास तोडण्यासाठी भाजपा आ. मेहता व त्यांच्या निकटवर्तीयांनी अनेक प्रयत्न केले असा आरोप शिवसेना, मनसे, काँग्रेस सह अनेक संघटना यांनी केले होते. मंदिर वाचवण्यासाठी शिवसेना शिंदेगटाने पुढाकार घेतला होता. त्याच अनुषंगाने शिवसेना शिंदेगटाने निवडणूक प्रचाराचा नारळ याच मंदिरात हनुमानाचे दर्शन घेऊन फोडला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक 'विकास आणि विश्वास' या मुद्द्यावर लढवली जात आहे असे ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sarnaik vows to destroy Mehta's 'Lanka' in Mira Bhainder election.

Web Summary : Shinde's Sena launched its Mira Bhainder election campaign at a Hanuman temple, vowing to defeat rivals. Sarnaik accused Mehta of trying to demolish the temple, promising to end his dominance.
टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाpratap sarnaikप्रताप सरनाईक