शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकारीच करतोय दारू तस्करी; उपनिरीक्षकासह चौघांवर गुजरातमध्ये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:06 IST

फरार पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा तपास गुजरात पोलिस करीत असून, याबाबत पालघर पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

तलासरी : महाराष्ट्रात दमण बनावटीच्या दारूची आयात करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रात बंदी असलेल्या दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचा गुजरातपोलिसांनी पर्दाफाश केला असून, यात तलासरी पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गुजरातमधील भिलाड पोलिस ठाण्याला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, यात दोघांना अटक करण्यात आली आहे. 

फरार पोलिस अधिकाऱ्यासह दोघांचा तपास गुजरात पोलिस करीत असून, याबाबत पालघर पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तलासरी भागातून गुजरातमधील सुरत येथे दारू जात असल्याची खबर गुजरातच्या गुन्हे अन्वेषण विभागाला लागल्याने त्यांनी ६ जानेवारी रोजी सापळा रचून कारवाई केली होती. तलासरी भागातून गाडीत भरून जाणाऱ्या कारमधील ५५१ बाटल्या पकडण्यात आल्या होत्या.

यावेळी गुजरात पोलिसांनी कारमधील नवीन रणछोडभाई वरिया, तसेच नीरव उर्फ पिंटू मधुसूदन देसाई या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गाडीमधील दारू तलासरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धांगडे,  तसेच त्यांचा एक माणूस याने सुरतमधील अर्जुनभाई नावाच्या व्यक्तीस पोहोचवायची आहे, असे सांगितले. यावरून गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिलाड पोलिस ठाण्याला गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. तलासरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक धांगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे गुजरात पोलिसांनी पालघर पोलिस अधीक्षकांना कळविले आहे.  गुन्हा दाखल होऊन दारू तस्करीचा आरोप असलेले उपनिरीक्षक धांगडे सध्या  आजारपणाच्या रजेवर आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGujaratगुजरात