शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

पालघर जिल्ह्यात शिवसेनेमध्ये बाहेरून आलेल्यांना चारही मतदारसंघांत उमेदवारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:53 AM

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत.

- पंकज राऊतबोईसर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी वसई, नालासोपारा, पालघर आणि डहाणू हे चार विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. या चारही मतदार संघामध्ये शिवसेनेकडून ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली ते सर्व नव्याने शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत.निवडणुकीत डावलले गेल्याने नाराज होऊन जिल्ह्यातील ज्येष्ठ सेना पदाधिकारी प्रकाश निकम यांनी आपला राजीनामा पक्ष प्रमुखांकडे आज पाठविला आहे. सेना नेत्यांनी याकडे गंभीरतेने न पाहिल्यास नाराजीमध्ये वाढ होऊन निवडणुकीतील गणिते बदलून त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.काँग्रेसमधून सेनेत दाखल झालेले विजय पाटील यांना वसईतून, पोलीस दलातून राजीनामा देऊन शिवबंधन बांधलेले प्रदीप शर्मा, दोन टर्म बोईसरची आमदारकी घेऊन बविआघाडीतून सेनेत प्रवेश घेतलेले विलास तरे तर २०१८ च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्व.खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना भाजपाने पोटनिवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर राजकीय खेळी व भाजपाला खिंडीत पकडण्याच्या उद्देशाने शिवसेनेत घेतल्याने वनगा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्वांना उमेदवारी देऊन शिवसेनेचे इच्छुक व निष्ठावंताच्या जखमेवरच मीठ चोळल्याची भावना व्यक्त होत आहे.२००९ पूर्वी उत्तर मुंबई लोकसभेचे क्षेत्र पालघरपर्यंत होते तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर व हितेंद्र ठाकूरांच्या पाठिंब्यामुळे सिनेअभिनेते गोविंदा निवडून येऊन त्यांनी खासदारकीची (अयशस्वी ) पहिली व एकमेव टर्म सोडली तर भाजपा-सेना युतीचे राम नाईकांचे अधिराज्य होते. त्यानंतर २००९ मध्ये उत्तर मुंबई व डहाणू मतदार संघाची पुनर्रचना करून वसई, नालासोपारा, पालघर, बोईसर, विक्र मगड व डहाणू या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेला पालघर लोकसभा मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला.२००९ मधील पालघर लोकसभेची पहिली निवडणूक बविआने जिंकली. परंतु त्या नंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीपैकी दोन भाजपा- शिवसेना युतीने तर २०१८ ची अत्यंत अटीतटीची झालेली पोटनिवडणूक भाजपाने सेनेच्या उमेदवाराला हरवून स्वबळावर जिंकली तर २०१९ ची निवडणुकीमध्ये भाजपाकडून राजेंद्र गावित यांना आयात करून सेना-भाजपा युतीचे शिवसेनेचे गावित जिंकले.बोईसर विधानसभेकरिता इच्छुकांमध्ये प्रथमपासून अग्रक्र मावर असलेल्या शिवसेना पालघर उपजिल्हा प्रमुख व कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी २००९ व २०१४ असे सलग दोन वेळा निवडून आलेले बविआ आघाडीचे आमदार व आता सेनेत प्रवेश केलेले विलास तरे यांच्यापेक्षाही जास्त प्रमाणात या मतदार संघात फिरून जनसंपर्क ठेवल्याचा दावा केला आहे.बालेकिल्ला सेनेचापालघर जिल्ह्यातील पालघर व डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीसह पालघर जिल्ह्यातील उत्तर-मध्य भाग शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. तर पालघर जिल्ह्यातील उर्वरित भागातही शिवसेनेचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे. सध्या पालघर विधानसभा या एकमेव मतदारसंघात आमदार अमित घोडा व जिल्ह्यातील एकमेव खासदार राजेंंद्र गावित हे दोघेही शिवसेनेचे आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाpalgharपालघर