जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 03:19 IST2018-06-19T03:19:40+5:302018-06-19T03:19:40+5:30

बिलोशी येथील शेतकरी विनोद चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर गेले असता त्यांच्यावर संदीप पाटील व इतर ९ जणांनी हल्ला करून फिर्यादी विनोद व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली.

Land dispute in two groups | जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी

जमिनीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी

वाडा : तालुक्यातील बिलोशी येथील शेतकरी विनोद चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर गेले असता त्यांच्यावर संदीप पाटील व इतर ९ जणांनी हल्ला करून फिर्यादी विनोद व त्याच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता घडली.
याबाबत वाडा पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी हे आपल्या कुटुंबियांसह शेतावर पेरणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याच गावातील संदीप गुरुनाथ पाटील, रु पेश अंकुश पाटील, निलेश लहू पाटील, लहू राघो पाटील, भूषण लहू पाटील, निखिल आत्माराम पाटील (सर्व रा. बिलोशी.), प्रवीण सुरेश पाटील, सागर पाटील व इतर 9 जणांनी त्यांच्या कुटुंबियांवर लाठ्या-काठ्या, चाकू-सुऱ्यानी हल्ला करून त्यांना जबर मारहाण केली. यात फिर्यादी विनोद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची पत्नी विजया हिचा हात फ्रँक्चर झाला आहे तर सौरभ तुकाराम चौधरी यांना जबर मार लागला आहे. जखमींवर ग्रामीण
रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Land dispute in two groups