सफाळे - केळवे रोड परिसरात मंगळवारी रात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ममता ज्वेलर्सचे मालक किशन रूपसिंग दसाना (२४) आणि त्यांच्या पत्नी मंजू दसाना यांच्यावर जीवघेणा हल्ला करून दरोडेखोरांनी अंदाजे ५० लाख रुपयांच्या सोने-चांदीसह रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दसाना दाम्पत्य दुकान बंद करून दागिन्यांची बॅग घेऊन घरी जात होते. केळवे रोड स्थानक जवळील पुलाखालून जात असताना सहा ते सात दरोडेखोरांनी त्यांना अडवले. त्यांनी लोखंडी रॉडने दसाना यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीरावर वार करत गंभीर जखमी केले. या झटापटी दरम्यान दसाना यांनी एका दरोडेखोराला पकडून ठेवले होते.
हातातील ऐवज हिसकावून सफाळेकडे दरोडेखोरांचे पलायन दुसऱ्या आरोपीने त्यांच्या डोक्यात सळईने वार केल्याने ते जखमी होऊन खाली कोसळले. याच वेळी आरोपींनी पत्नी मंजू दसाना यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या हातातील सोने-चांदीची बॅग हिसकावून घेत रेल्वे रुळांच्या दिशेने सफाळेकडे पळ काढला. या घटनेत ५० लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षाच्या घटनेची पुनरावृत्तीदरोड्याची घटना सफाळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनेनंतर परिसरात कडक नाकाबंदी करण्यात आली असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, याच परिसरात २७ मार्च २०२५ रोजीही अशाच प्रकारचा दरोड्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी सतर्क नागरिकांमुळे मोठी घटना टळली होती. मात्र, आरोपींनी गोळीबार करत पळ काढला होता.
Web Summary : Dacoits attacked a jeweler couple near Kelwe Road, looting ₹50 lakh in gold, silver, and cash. The couple was severely injured. Police are investigating, increasing security in the area after the incident.
Web Summary : केळवे रोड के पास डकैतों ने एक ज्वैलर्स दंपति पर हमला कर ₹50 लाख के सोने, चांदी और नकदी लूट लिए। दंपति गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस जांच कर रही है और इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है।