शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोची शेकडो कामे अपूर्ण

By admin | Updated: December 16, 2014 22:59 IST

आदिवासींच्या विकासासाठी शासन करोडो रू. खर्च करीत आहे. पाण्यासाठी नवनवीन योजना केल्या जात आहे व जनसुविधेतून विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम शासनस्तरावर केले

विक्रमगड : आदिवासींच्या विकासासाठी शासन करोडो रू. खर्च करीत आहे. पाण्यासाठी नवनवीन योजना केल्या जात आहे व जनसुविधेतून विकास कामांना प्राधान्य देण्याचे काम शासनस्तरावर केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र तालुक्यात आजही रोजगार हमी योजना, जलस्वराज्य योजना, स्मशानभूमी, नळपाणीपुरवठा, अंगणवाड्या या अपूर्ण अवस्थेत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या योजना पूर्ण का झाल्या नाहीत त्याबाबत देखरेख करणारी यंत्रणाच सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.आदिवासीच्या विकासाच्या गप्पा केल्या जातात. कागदी घोडे नाचविले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र विदारक चित्र दिसून येत आहे. तालुक्यात २०११-१२ पासून रोजगार हमीच्या ५९९ विहिरी, ५६ रस्ते अर्धवट आहेत. तर जिल्हा नियोजन, नाबार्ड आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१०-११ ते आजतागायत ९७ अंगणवाड्या मंजूर असताना ५५ अंगणवाड्या अपूर्ण आहेत. तर २२ अंगणवाड्यांच्या निधी वापरला गेला आहे. जनसुविधेच्या स्मशानभूमी अर्धवट तर जलस्वराज्य योजनेच्या झालेला बट्याबोळ अनेक योजना अर्धवट अवस्थेत असताना नळपाणीपुरवठाच्याही ४ ते ५ योजना अर्धवट अवस्थेत आहे. या सर्व योजनाची प्रगती केव्हा होणार की होणार नाही या पार्श्वभूमीवर प्रयोगशील आनंदायी आणि आरोग्यदायी शिक्षणासाठी रोजगारासाठी अजून आदिवासींना किती वर्ष वाट पाहावी लागणार आहे असा सवाल होत आहे.याबाबत गटविकास अधिकारी व्ही. के. पिंपळे यांना विचारले असता या योजना अपूर्ण आहेत ही सत्य परिस्थिती असून त्या पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जाणार आहे पंचायत स्तरावर या योजना पूर्ण होणार नसतील व आदिवासी विकास होणार नसेल तर पंचायत समितीचा काय उपयोग यासाठी येत्या ८ दिवसात पंचायत समितीला टाळे लावण्यात येणार असल्याची माहिती तालुका शिवसेना प्रमुख सुनिल पोतदार यांनी दिली. (वार्ताहर)