शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: January 5, 2016 00:50 IST

नालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे

शशी करपे, वसईनालासोपारा परिसरात असलेल्या नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, पेल्हारसह गोखिवरे परिसरातील अनेक भागांत पाणीटंचाईने लोकांना त्रस्त केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील लोक दिवसरात्र अक्षरश: भटकंती करीत आहेत. या टंचाईच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी घटना म्हणजे या भागात पाणीविक्रीचा नवा धंदा अनेकांनी सुुरू केला असून येथील गोरगरीब जनतेला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.नालासोपारा शहराचा नियोजनबद्ध विकास न झाल्याने येथील लोक नागरी समस्यांनी ग्रासले आहेत. शहरात वन आणि आदिवासींच्या जागा हडप करून बेकायदा चाळी आणि झोपडपट्ट्या बांधल्या गेल्या आहेत. नगीनदासपाडा, विजयनगर, तुळिंज डोंगरी, संतोष भवन, गवराईपाडा, बिलालपाडा, धानीवबाग यासह वसई पूर्वेकडील गोखिवरे, सातिवली परिसर झोपडपट्ट्या आणि बेकायदा चाळीने वेढला गेला आहे. या परिसरात गोरगरीब लोकांनी हक्काची घरे विकत घेतली आहेत. मात्र, येथील किमान लाखभर लोकसंख्या असलेला परिसर अनधिकृत असल्याने महापालिकेला नागरी सुविधा पुरवणे डोकेदुखी होऊन बसली आहे. त्यातही माणुसकीच्या दृष्टिकोनातून काही भागांत पाणीपुरवठा केला गेला आहे. तसेच अगदी दाटीवाटीने वसलेल्या चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाइपलाइन टाकणेही अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने पाणीपुरवठा अतिशय कमी असल्याने येथील लोकांना बाराही महिने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या गळक्या व्हॉल्व्हमधील पाणी भरण्यासाठी या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसतात. परिस्थिती इतकी भीषण आहे की, लोक गटारांतून जाणाऱ्या पाइपलाइनमधून पाणी भरताना दिसतात. या भागात अनेकांनी आता पाणी विकण्याचा धंदा सुुरू केला आहे. टँकरने पाणी मागवून सिंटेक्सच्या टाकीत भरून ठेवले जाते. त्यानंतर, लोकांना वीस लीटर पाणी पाच रुपये दराने विकले जाते. पिण्यासाठी लोकांना आता याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कित्येक ठिकाणी पाणीविक्रेते पाहावयास मिळतात. सध्या वसई-विरार परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मोठमोठ्या इमारतींना पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. सध्या पाणीपुरवठा मर्यादित असल्याने पालिकेने नव्या वसाहतींना नळकनेक्शन देणे बंद केले आहे. उलट, चोरटी कनेक्शन्स शोधून ती तोडण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. जादा पाणी मिळण्यास अजून पाच-सहा महिने लागतील. त्यानंतर, पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. पण, तोपर्यंत लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.