शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वसई - विरार मनपात वकिलांचे नवीन पॅनल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:52 IST

११ वकिलांची तीन वर्षांसाठी नियुक्ती; अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा मार्ग होणार मोकळा

नालासोपारा : दोन वर्षांपेक्षा अधिक काळ रखडलेल्या नवीन वकिलांच्या नियुक्तीला अखेर महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ११ सप्टेंबर रोजीच्या सभेमध्ये याला वित्तीय तसेच प्रशासकीय मान्यता मिळाली असून सर्वोच्च न्यायालयासाठी २, उच्च न्यायालय ४, कामगार /औद्योगिक न्यायालय १ आणि वसई न्यायालय ४ अशा एकूण ११ वकिलांची टीम वसई - विरार महानगरपालिकेने तीन वर्षासाठी नियुक्त केली आहे. तसेच अजून गरज पडल्यास अधिक वकिलांची नियुक्ती अथवा त्यात बदल करण्याचा अधिकार आयुक्तांना देण्यात आला आहे. या नियुक्त केलेल्या टीममध्ये वसई न्यायालयासाठी अ‍ॅड. संतोष खळे, अ‍ॅड. स्वप्नील भदाणे, अ‍ॅड. पुष्पक राऊत, अ‍ॅड. योगेश विरारकर, कामगार न्यायालयासाठी अ‍ॅड. सेल्विया डिसोझा, उच्च न्यायालय अ‍ॅड. अतुल दामले, अ‍ॅड. राजेश दातार, अ‍ॅड. अमोल बावरे, अ‍ॅड. स्वाती सागवेकर तर सर्वोच्च न्यायालय अ‍ॅड. बांसुरी स्वराज, अ‍ॅड. सुहास कदम यांचा समावेश आहे.वसई - विरारमधील अनधिकृत बांधकामे, त्याला मिळणारी न्यायालयीन स्थगिती, त्या स्थगितीआडून बांधकामे पूर्ण होऊन त्यातून सामान्य नागरिकांची फसवणूक होत होती. तसेच शहर नियोजनाचाही बोजवारा उडत होता. यामध्ये महापालिका अधिकारी आणि विधी विभागाचा नाकर्तेपणा तसेच जवळपास साडेचार कोटींहून अधिक फी वकिलांना देऊनही ही स्थगिती उठवण्यास वकिलांना आलेले अपयश असा हा सर्व प्रकार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये माहिती अधिकार अंतर्गत मिळालेल्या माहितीमधून उघड केला होता. प्रसिद्धी माध्यमातून झालेली टीका आणि प्रक्षुब्ध जनमत लक्षात घेऊन तात्कालिक आयुक्तांनी जुने पॅनल बरखास्त करून नवीन वकील पॅनल नेमण्याचा निर्णय घेतला.सततच्या पाठपुराव्यानंतर १३ आॅक्टोबर २०१७ च्या महासभेत नवीन वकील पॅनल नेमण्याचा विषय मंजूर झाला. परंतु त्यासंबंधी जाहिरात निघण्यासाठी जानेवारी २०१८ उजाडावे लागले. त्यानंतरच्या पाठपुराव्यानंतर जून २०१९ म्हणजे तब्बल सव्वा वर्षानंतर इच्छुक वकिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आतापर्यंत त्याला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ अनधिकृत बांधकामासंदर्भात जवळपास दोन हजारांहून अधिक दावे न्यायालयामध्ये प्रलंबित होते आणि केवळ एकमेव वकील या सर्व दाव्यांवर न्यायालयात युक्तिवाद करत होते.स्थगितीचा आदेश लवकरात लवकर उठवणे, दावे निकाली काढण्यासाठी कार्यक्षम वकिलांचे पॅनल लवकरात लवकर नियुक्त करणे, महापालिकेने अनिधकृत बांधकामावरील सर्व स्थगिती आदेशाविरोधात एकत्रितरित्या वरच्या न्यायालयात याचिका दाखल कारणे, विधी विभाग सक्षम करून नवीन पॅनल नेमणे तसेच अनधिकृत बांधकामांना न्यायालयीन स्थगिती आदेश न मिळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे तसेच प्रशासन पातळीवर एमआरटीपी अ‍ॅक्टच्या तरतुदींचे पालन होणे यावर महापालिकेने तातडीने निर्णय घेण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले असून नवीन वकील पॅनल नियुक्तीसोबत अनधिकृत बांधकामासंबंधी खटले वरच्या न्यायालयात एकत्रित याचिका करून निकाली काढण्यासंदर्भात विधी विभागाला निर्देश दिल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे.दोन हजारांहून अधिक दावे प्रलंबितजवळपास ५ वर्षांपेक्षा जास्त काळ होऊनही अनेक दाव्यांमध्ये अनधिकृत बांधकामावरील न्यायालयीन स्थगिती उठवण्यात अपयश येत होते. यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाई देखील थांबलेली होती. या सर्वांचा दुष्परिणाम म्हणून आजही महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती आणि बांधकामे बिनदिक्कतपणे उभी रहात असून न्यायालयीन स्थगितीमुळे सदर बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब होत आहे. याबाबतचे जवळपास दोन हजारांहून अधिक दावे न्यायालयात प्रलंबित होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका