शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीचा उपास, तरी चिकन खायचा हट्ट; आईची लाटण्याने मारहाण, चिमुकला दगवला, मुलगी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 17:14 IST

तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.

हितेन नाईक, पालघर:- चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी आईकडे हट्ट धरणाऱ्या दोन मुलांना नवरात्रीचा उपवास असल्याने नकार दिला.मात्र दोन्ही मुलांनी अधिक आग्रह धरल्याने जन्मदात्री आई पल्लवी धुमडे (वय ४० वर्ष) हिने हातातील लाटण्याने आपल्या ७ वर्षीय मुलगा आणि १० वर्षीय मुलीला जोरदार मारहाण केली.ह्या घटनेत चिन्मय ह्या ७ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.तर लव्या ही मुलगी रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून तिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली.

पालघर - सातपाटी रस्त्यावरील काशीपाडा मधील घोडेला कॉम्प्लेक्स,शाम रिजेन्सी मध्ये आरोपी आई पल्लवी धुमडे (वय ४० वर्ष) ह्या आपल्या चिन्मय (वय ७ वर्ष) आणि लव्या  (१० वर्ष) ह्या दोन मुला सोबत आपल्या बहिणीकडे राहत होती.आपल्या पतीशी पटत नसल्याने काही महिन्यापूर्वी भाईंदर येथून ती काशीपाडा येथे राहण्यास आली होती.शुक्रवारी रात्री चिन्मय आणि लव्या ह्या दोन्ही मुलांनी आई कडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट धरला.मात्र सध्या नवरात्रीचे उपवास असल्याने माझा उपवास आहे त्यामुळे चिकन लॉलीपॉप मिळणार नाही असे आईने सांगितले.त्यावर दोन्ही मुलांनी आईकडे अधिक आग्रह धरल्याने आरोपी आई ला रागावर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने तिने संतापून घरातील लाकडी लाटण्याने दोन्ही मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

ह्या मारहाणीत चिन्मय ह्याच्या डोक्याला झालेली मारहाण त्याच्या वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.तर मुलगी ही जखमी झाल्याने तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी दिली. ह्या प्रकरणी आरोपी आई पल्लवी हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Navratri Fast, Chicken Demand: Mother Beats Children, Son Dead

Web Summary : During Navratri, an Indian mother in Palghar fatally beat her 7-year-old son and injured her 10-year-old daughter with a rolling pin for demanding chicken, which she refused due to her fast. The mother has been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी