शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

कोणी मातीचे मडके, रांजण, चुली घेता का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 00:15 IST

कोरोनामुळे कारागीर आर्थिक संकटात 

 लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : कोविड - १९चा प्रादुर्भाव वाढल्याने मनोर येथील मडके बाजार थंडावला आहे. कारागिरांनी मातीपासून विविध वस्तू बनवल्या आहेत, मात्र एप्रिल महिना संपत आला तरी ग्राहक येत नसल्याने यावर्षी प्रचंड नुकसान होणार असल्याच्या चिंतेत कारागीर सापडले आहेत.गरिबांचा फ्रीज म्हणून मनोरच्या मडके बाजारात लहान-मोठ्या रांजण, मडके यांना खूप पसंती असते. उष्णता वाढू लागली की, एप्रिलच्या सुरुवातीला ग्राहकांची गर्दी वाढू लागायची. रांजणासोबतच चुली, विविध प्रकारची मातीची भांडीही लोक आवर्जून घेऊन जायचे. आम्हाला त्याचा फायदा होत असे, परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने सध्या बाजारात येणाऱ्या लोकांची गर्दी कमी झाल्यामुळे आम्ही तयार केलेला माल पडून आहे. त्यामुळे आम्ही जगायचे कसे? अशी चिंता आम्हा सर्वांना पडली आहे. मातीपासून घडवलेल्या विविध वस्तू तयार आहेत, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी कोणीही ग्राहक येत नसल्याने रांजण, मडके व इतर वस्तू पडून आहेत. आमच्या आजोबा-पणजोबांपासून पारंपरिक पद्धतीने मातीपासून विविध आकाराच्या वस्तू बनवून विक्री करायचा हा व्यवसाय चालत आला आहे. पण सध्या ग्राहकच नसल्याने आमच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे, असे राहुल साळवी यांनी सांगितले.